Advertisement

जे. जे. रुग्णालयातील ६० कर्मचारी विलगीकरण कक्षात

रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका तसंच इतर कर्मचारी अशा एकूण ६० जणांना रुग्णालयामध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

जे. जे. रुग्णालयातील ६० कर्मचारी विलगीकरण कक्षात
SHARES

मुंबईतील जे. जे. रुग्णालयात २ दिवसांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता. या रुग्णाची चाचणी केली असता त्याचा चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळं रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका तसंच इतर कर्मचारी अशा एकूण ६० जणांना रुग्णालयामध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

जे. जे. रुग्णालयात मुंबईसर राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळं कोरोना हा संसर्गजन्य असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयातील ६० कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. ८ एप्रिल रोजी पक्षाघात झालेली एक व्यक्ती उपचारासाठी जेजे रुग्णालयातील वॉर्ड क्र. ९मध्ये दाखल झाली होती.

२ दिवसांपूर्वी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या करोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळं त्या व्यक्तीच्या संपर्कात असलेले रुग्ण, डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचारी यांना वॉर्ड क्रमांक ४२मध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जेजेमध्ये विलगीकरणासाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तेथेच या कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा