Advertisement

५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

मे आणि जून महिन्यात ६ ते १८ वयोगटांतील लहान मुलांचा मुंबईतील २४ वॉर्डमध्ये सर्व्हे केला होता.

५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज
SHARES

मुंबई महानगरपालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडीज आढळल्या आहेत. मे आणि जून महिन्यात ६ ते १८ वयोगटांतील लहान मुलांचा मुंबईतील २४ वॉर्डमध्ये सर्व्हे केला होता.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर सेरो सर्व्हेचा हा निकाल आशादायक मानला जात आहे. या सर्व्हेसाठी एकूण दहा हजार मुलांचे नमुने घेण्यात आले होते, अशी माहिती आहे.

एप्रिलमध्ये झालेल्या एका सर्व्हेमध्ये मुंबईतील इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची कोरोना रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा निष्कर्ष तिसऱ्या सेरो सर्व्हेतून समोर आला होता. तर दुसरीकडे झोपडपट्टी रहिवाशांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचे समोर आले होते. यासाठी २४ विभागांमध्ये दहा हजारांहून अधिक लोकांचा सर्व्हे करण्यात आला होता.

दरम्यान, कोरोनाविरुद्ध लस (Corona vaccine) हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. मुंबईतील (Mumbai) २.९ लाख कोरोना रूग्णांच्या सर्वेक्षणात हे स्पष्ट देखील झालं आहे. मुंबई पालिकेनं (BMC) १ जानेवारी ते १७ जून या कालावधीत २ लाख ९० हजार कोरोना रुग्णांचं सर्वेक्षण केलं.

मुंबईत काही लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही. मात्र कोरोना लसीचा पहिला डोसही अधिक चांगलं काम करत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

२.९ लाख लोकांपैकी केवळ २६ जण कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्याचबरोबर पहिल्या डोसनंतर १० हजार ५०० जणांना कोरोनाची लागण झाली. पालिकेच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२१ ते १७ जून २०२१ या काळात मुंबईत सुमारे ४० लाख ७५ हजार ३९३ लोकांनी लस घेतली. यापैकी केवळ ०.२३% लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे.



हेही वाचा

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर केवळ २६ जण पॉझिटिव्ह

दररोज १५ लाख लसीकरणाची शासनाची तयारी- उद्धव ठाकरे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा