Advertisement

डेल्टा प्लस व्हेरियंटचे राज्यात सात रुग्ण, तिसऱ्या लाटेचा धोका

डेल्टा व्हेरियंटमुळं महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली होती. तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अजून वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंटचे राज्यात सात रुग्ण, तिसऱ्या लाटेचा धोका
SHARES

राज्यावर आता कोरोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेच्या संकट उभं राहिलं आहे. महाराष्ट्रात (maharashtra)  कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे सात रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर येथे डेल्टा प्लस व्हेरियंट (Delta Plus Variant) चे रुग्ण आढळले आहेत. डेल्टा प्लस व्हेरियंट भारतातच पहिल्यांदा आढळून आला असून तो डेल्टा किंवा बीटा 1. 617.2 या विषाणूमध्ये बदल होऊन तयार झाल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. 

नव्या व्हेरीयंटच्या सात रुग्णांपैकी पाच जण रत्नागिरी येथील आहेत. नवी मुंबई (navi mumbai), पालघर (palghar) आणि रत्नागिरी (ratnagiri) येथे आढळलेल्या, डेल्टा प्लस व्हेरियंट (Delta Plus Variant) च्या रुग्णांचे नमुने आणखी काही ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या चाचण्याचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. हा नवीन व्हेरियंट कितपत धोकादायक आहे याबाबत तपास सुरु आहे.

डेल्टा व्हेरियंटमुळं महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली होती. तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अजून वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात डेल्टा-प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असं तज्ञांनी सांगितलं होतं. तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या तुलनेनं अधिक वाढू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पहिल्या लाटेत १९ लाख तर, दुसऱ्या लाटेत ४० लाख रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, या तिसऱ्या लाटेत आठ लाख सक्रीय रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये१० टक्के मुलांना संसर्ग होण्याची भीती आहे, असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे. या म्युटेशनला जागतिक आरोग्य संघटनेनं डेल्टा व्हेरियंट नाव दिलं होतं. पण आता या व्हेरियंटमध्येही म्युटेशन झाल्यामुळं डेल्टा प्लस असा व्हेरियंट तयार झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे अद्याप डेल्टा प्लस काळजी करण्याजोगा व्हेरियंट नसल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.हेही वाचा -

३० ते ४४ वयोगटाचं मोफत लसीकरण

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करत असाल तर सावधान!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा