डॉक्टरांच्या मदतीमुळे झाली न परवडणारी ‘हिप’ शस्त्रक्रिया

Mumbai
डॉक्टरांच्या मदतीमुळे झाली न परवडणारी ‘हिप’ शस्त्रक्रिया
डॉक्टरांच्या मदतीमुळे झाली न परवडणारी ‘हिप’ शस्त्रक्रिया
See all
मुंबई  -  

आपल्याला आपल्या पायावर उभं राहता येत नाही, चालताच येत नाही या गोष्टीमुळे हताश झालेल्या ‘रविशंकर बेनबेन्से’ (21) हा आज कांदिवलीतील पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार घेत आहे. रविशंकरला गेल्या 5 वर्षांपासून संधीवाताचा त्रास आहे. काही वर्ष त्याला चालताही येत नव्हतं. संधिवातामुळेे या मुलाचे नितंब (हिप्स) पूर्णपणे खराब झाले होते. शेवटी शस्त्रक्रियेशिवाय कुठलाच पर्याय नव्हता. रविशंकरवर शताब्दी रुग्णालयात 10 जूनला डाव्या पायाच्या ‘हीप’ची शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रगत विज्ञानाच्या आजच्या जगात नितंब अर्थात हिप्सवर शस्त्रक्रिया तुलनेने कमी गुंतागुंतीची  असली तरीही रविशंकरच्या कुटुंबियांसाठी ती आर्थिकदृष्ट्या कमी गुंतागुंतीची नव्हती. शताब्दी रुग्णालयाने या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक भार उचलत रविशंकर आणि त्याच्या कुटुंबियांचा तणाव कमी करण्यात मोठा वाटा उचलला.  


खासगी रुग्णालयात 5 लाख एवढा खर्च

हिप शस्त्रक्रियेचा खर्च हा खासगी रुग्णालयात जवळपास साडे चार लाख एवढा येतो. रविशंकरच्या कुटुंबियांना या शस्त्रक्रियेचा खर्च उचलणं खूप कठीण होतं. रविशंकरच्या बऱ्याच रुग्णालयांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. पण, प्रत्येक रुग्णालयातील खर्च हा परवडणारा नव्हता. तरीही त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या रुग्णालयात त्याच्या शस्त्रक्रियेसाठी 2 लाख 90 हजार इतका खर्च सांगण्यात आला. पण, हा एवढा खर्च आपल्याला परवडणार नसल्याचं रविशंकरच्या कुटुंबियांनी सांगितलं. त्यामुळे शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांनी काही संस्थांकडून डोनेशन मागण्याचा पर्याय सुचवला. पण, रविशंकरची परिस्थिती एवढी गंभीर होती की त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. डॉक्टरांनी त्याला दाखल करुन घेतलं आणि शस्त्रक्रिया केली. त्याला रुग्णालयातर्फेच आर्थिक मदत पुरवली जात आहे. पुढच्या शस्त्रक्रियेसाठी आम्ही डोनेशन जमा करणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

रविशंकरला उत्तरप्रदेशातून खास शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आणलं गेलं.  वैद्यकीय तपासणीनंतर त्याचेे दोन्ही हिप पूर्णतः खराब असल्याचे निदान करण्यात आलं. शस्त्रक्रियेशिवाय कुठलाही पर्याय नसल्याने 10 जूनला त्याच्या डाव्या पायाच्या हीपची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या रविशंकरवर शताब्दी रुग्णालयातच उपचार सुरू असून 27 जुलैला दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

नवा विक्रम...

सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया रुग्णाच्या वयाच्या तिशी ते चाळीशीदरम्यान केल्या जातात. शताब्दी रुग्णालयातही याच वयोगटात असा पद्धतीच्या शस्त्रक्रिया  करण्यात आल्या आहेत. रविशंकरच्या बाबतीत मात्र वेगळंच घडलं. वयाच्या 21  व्या वर्षीच त्याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. इतक्या कमी वयाच्या रुग्णावर अशा पद्धतीची शस्त्रक्रिया होण्याची शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती रविशंकरकर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. एरवी चाळीशीच्या आसपास उद्भवणारा संधिवातासारखा आजार रविशंकरच्या बाबतीत कमी वयातच उद्भवला. 
“ जेव्हा रविशंकर आमच्याकडे आला त्यावेळेस त्याला चालता येत नव्हते. त्याच्या दोन्ही हीप निकामी झाल्या होत्या. पण, शस्त्रक्रियेसाठी जवळपास साडे 4 लाख एवढा खर्च येणार होतो. पण, आम्ही ती शस्त्रक्रिया 2 लाख 90 हजार रुपयांपर्यंत करत आहोत. हीप्समध्ये इम्प्लांट बसवावं लागतं. ज्याचीच किंमत जवळपास 1 लाख 25 हजारांपर्यंत आहे. रुग्णालयात ‘पुवर बँक’ ही एक पद्धत असते. आम्ही त्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्यातून पैसे पुरवले आहेत. तसंच आम्ही काही स्वयंसेवी संस्थेद्वारे 50 हजार रुपये जमा केले आहेत. आणखी 25 हजार रुपये एका संस्थेकडून देण्यात येणार आहेत. त्याच्या फक्त एका हिपच्या शस्त्रक्रियेसाठी 1लाख 25 हजार एवढा खर्च आला आहे.   ”

डॉ. जयंत चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, शताब्दी रुग्णालयाचे


डॉ. ओम यांच्या टीमच्या निरीक्षणाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याविषयी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना डॉ.ओम यांनी आणखी दोन लहान मुलं अशा शस्त्रक्रियेसाठी आपल्याकडे दाखल झाली असल्याची माहिती दिली. 


खासगी रुग्णालयात हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेसाठी जवळपास 5 लाखांहून अधिक खर्च येतो. पण, पालिका रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. ही चांगली गोष्ट आहे. साधारण पन्नाशी गाठलेल्यांना संधिवाताचा त्रास होतो. पण, आता तर त्याच प्रमाण तरुणांमध्येही पाहायला मिळतंय. हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया हा शक्यतो शेवटचा पर्याय म्हणून वापरला जातो.  

डॉ. कौशल मल्हार, हीप रिप्लेसमेंट सर्जन, फोर्टिस रुग्णालय  


मुंबईतील पालिका रुग्णालयांतही आता ‘हीप’ रिप्लेसमेंट सारखी शस्त्रक्रिया केली जात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालिका रुग्णालयात गरीब आणि गरजूंना परवडणाऱ्या किंमतीत ही शस्त्रक्रिया केली जात असून याचा फायदा गरीब रुग्णांना होत आहे.

काय आहे संधिवात?


  • वेदना आणि अपंगत्व देणारा आजार.
  • व्यायामाच्या अभावामुळे स्नायूंचा अशक्तपणा, स्नायूंची झिज होते.
  • सांधे दुखतात, त्यामुळे जिने चढले किंवा उतरले तरी गुडघे दुखतात. सुजेमुळे सांधे आतून खराब होतात.
  • स्त्रियांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण जास्त आहे.
  • लहान मुलांना संधिवातीचा त्रास झाला तर त्यांची वाढ खुंटते. शस्त्रक्रिया करणं हाच शेवटचा पर्याय असतो.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.