Advertisement

कोरोनामुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती- डाॅ. हर्षवर्धन

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक झाल्याचं वक्तव्य केंद्रीय कुटुंबकल्याण आणि आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती- डाॅ. हर्षवर्धन
SHARES

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक झाल्याचं वक्तव्य केंद्रीय कुटुंबकल्याण आणि आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे. 

डाॅ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे आणि केंद्र तसंच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील कोविड-१९ ची परिस्थिती, करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि व्यवस्थापन यावर या बैठकीत चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

यावेळी महाराष्ट्रातील ३६ जिल्यांपैकी ३४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. राज्यांत कोरोनाचे जवळपास १०२६ कंटेन्मेंट झोन झाले आहेत. त्यातही मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, सोलापूर इथली परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक आयोजित करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल.

हेही वाचा - धारावीसाठी पालिकेचा 'असा' आहे अॅक्शन प्लान

केंद्र सरकारचं वैद्यकीय पथक आणि डॉक्टर्स मुंबईत आहेत. महाराष्ट्रात एकही नवीन रुग्ण आढळू नये यासाठी महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून हवी ती मदत केली जाईल, असं हर्षवर्धन म्हणाले.

सिरी, इलीकडे दुर्लक्ष नको 

बिगर कोविड रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक आरोग्यसेवांकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये, यावर डॉ हर्षवर्धन यांनी भर दिला. तसंच SARI आणि ILI च्या सर्व संशयित रुग्णांचं स्क्रीनिंग आणि तपासणी होईल, याची विशेष दक्षता घ्यावी, जेणेकरुन काही नवे हॉटस्पॉट असतील, तर त्यांचा वेळेत शोध लागून निश्चित वेळेत धोरण आखता येईल आणि योग्य व्यवस्थापन करता येईल, असे हर्षवर्धन यांनी सांगितलं. 

कोविड-१९ च्या रुग्णांबाबत असलेला भयगंड आणि त्यांना दिली जाणारी वेगळी वागणूक थांबवण्यासाठी आपल्याला संवादाच्या पद्धतीत महत्वाचे बदल करावे लागतील, असं ते म्हणाले. असं झालं तरच, रुग्णांचा तपास आणि नोंद योग्य वेळी होऊन वैद्यकीय व्यवस्थापनामुळे आजाराला बळी पडण्याचं प्रमाण कमी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मृत्यूदर घटला

महाराष्ट्रामध्ये ९८४ नव्या केसेससह एकूण रुग्णसंख्या १५,५२५ झाली आहे. आणखी ३४  मृत्यूसह राज्यातील एकूण कोविड-१९ मृत्यूसंख्या ६१७ झाली आहे. नवीन नोंद झालेल्या केसेसमध्ये ६३५ मुंबईतील आहेत मुंबईमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर हा एक महिन्यापूर्वीच्या ७.२ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. राष्ट्रीय मृत्युदर हा ३.२ टक्के आहे.

हेही वाचा - कोरोनाचा हाहाकार ! एका दिवसात आढळले 1233 नवे रुग्ण, 48 तासात 68 जणांचा मृत्यू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा