Advertisement

'या' विद्यार्थ्याला जडलाय 'स्लीप सेक्स'चा दुर्मिळ आजार...


'या' विद्यार्थ्याला जडलाय 'स्लीप सेक्स'चा दुर्मिळ आजार...
SHARES

सायन रुग्णालयातील डॉक्टर सध्या २१ वर्षीय तरूणाला झालेल्या 'स्लीपसेक्स' आजाराचा अभ्यास करत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा एक दुर्मिळ आजार असून या आजाराची नोंद सहजासहजी होत नाही. हा आजार होऊ नये म्हणून मुलांना खरंतर 'सेक्स एज्युकेशन' देण्याची तीव्रतेने गरज असल्याचं मत डाॅक्टरांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना मांडलं.

शालेय अभ्यासक्रमात मुलींना मासिक पाळीविषयी मार्गदर्शन केलं जातं. तसंच मुलांनाही 'सेक्स एज्युकेशन' देणं गरजेचं आहे, असं मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सायन रुग्णालयात उपचार घेत असलेला हा तरूण इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे. शिक्षण घेण्यासाठी हा तरूण मुंबईत आला आहे. हा विद्यार्थी इतर सहकाऱ्यांसोबत एका हाॅस्टेलमध्ये राहतो. त्याच्यासोबत हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनी त्याला सांगितलं की तो झोपेत 'सेक्स' किंवा 'हस्तमैथून' करतो. 

तुम्ही म्हणाल की, झोपेत असताना 'सेक्स' म्हणजे नेमकं काय ? तर, हा विद्यार्थी झोपेत असताना आपल्या मित्रांसोबत शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न करतो किंवा 'हस्तमैथून' करतो. या प्रकाराने त्रस्त झाल्यावर विद्यार्थ्याने अखेर सायन रुग्णालयात धाव घेतली. या विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत.


हे प्रकरण खूप दुर्मिळ आहे किंवा अशा प्रकरणांची सहसा नोंद होत नसावी. या समस्येला 'स्लीप सेक्स' किंवा 'सेक्सोमेनिया' म्हणतात. हा रुग्ण झोपेत आपल्या मित्रांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा किंवा 'हस्तमैथून' करायचा. त्याच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यानंतर आम्ही त्याच्यावर औषधोपचार सुरू केले आहेत.
- डॉ. सागर करिया, मानसोपचारतज्ज्ञ, सायन रुग्णालय


कसा होतो हा आजार?

काही तरुणांना अश्लील चित्रपट (पॉर्न फिल्म) बघण्यात बराच रस असतो. सातत्यानं असे चित्रपट पाहिल्यावर या तरूणांच्या डोक्यात सतत सेक्सबद्दल विचार येत राहतात. तरूण वय असल्याने त्यांचं शरीरही विकसीत होत असतं. त्यामुळे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची त्यांची इच्छा प्रबळ होत असते. मनावर ताबा ठेवण्यात अपयश आल्यावर असे प्रकार घडतात, असं मानसोपचारतज्ज्ञांचं म्हणणं आहे.


यावर उपाय काय?

  • तरुण वयाच्या मुलांनी अभ्यास आणि खेळांत जास्त भर द्यावा
  • यामुळे मन भरकटणार नाही
  • मन शांत ठेवण्यासाठी व्यायाम, योगा करावा
  • शरीरात होणाऱ्या बदलांसाठी डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन घ्यावं


खरंतर झोपेत 'हस्तमैथून' करणं ही वाढत्या वयाची आणि शरीरातील बदलाची लक्षणं असतात. पण त्याचा मानसिकतेवर कुठेही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी मुलांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं असतं. त्यासाठी मुलांना 'सेक्स एज्युकेशन' देणं फार महत्त्वाचं आहे.
- डॉ. नूतन लोहिया, मानसोपचारतज्ज्ञ



हेही वाचा -

सेक्सवर बोलायला लाज कसली?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा