Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

धुरक्यामुळे गरोदर महिलांमध्ये वाढले श्वसनाचे विकार


धुरक्यामुळे गरोदर महिलांमध्ये वाढले श्वसनाचे विकार
SHARES

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात पसरलेल्या धुरक्याचा सर्वाधिक परिणाम हा गर्भवती महिलांवर होत असल्याचं निरीक्षण मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हाॅस्पीटलतर्फे नोंदवण्यात अालं अाहे. धुरक्यामध्ये गाडीच्या वाहनांच्या धूराचा भरणा होत असल्याने 'क्रोनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज' म्हणजेच काळ्या दम्याच्या श्वसनविकाराचा त्रास गर्भवती महिलांना अाणि नवजात बालकांना होत अाहे.


गरोदर मातांमध्ये प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना थंडीमध्ये वारंवार सर्दी, पडसं, खोकला, ताप आणि किटकांपासून होणाऱ्या आजारांची लागण लगेच होते. गेल्या महिनाभरात गरोदर महिलांमध्ये ८ ते ९ टक्क्यांनी श्वसनविकारांत वाढ झाली असून ही संख्या भविष्यात वाढेल. सध्या मोठ्या प्रमाणात तयार होत असलेल्या धुरक्यामुळे गरोदर महिलांमध्ये धाप लागणे, छातीत जळजळ होणे तसेच न्यूमोनियाची लागण होत अाहे."
- डॉ. गंधाली देवरुखकर, ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल


मोकळ्या हवेत फिरू नका

वातावरणात असलेलं हे धुरकं श्वसन मार्ग, सायनस आणि अनुनासिक पोकळी उपनिर्मित करतो. गरोदर महिलांची नॉर्मल प्रसूती होण्यासाठी त्यांना मोकळ्या हवेत चालण्याचा सल्ला दिला जातो. पण, सध्याची दूषित वातावरणाची परिस्थिती पाहता त्यांनी घरातल्या घरातच चालणे फायद्याचं ठरेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


धुरक्यामुळं शरीरावर होणारे दुष्परिणाम

खराब प्रदूषणाचा पहिला फटका माणसाच्या श्वसनसंस्थेला बसतो. फुफ्फुसाचा कर्करोग, विविध प्रकारचे हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात घुसणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. या धुरक्यामुळे शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रोहिणी या रक्तवाहिन्यांना स्लेरोसिसची व्याधी जडते, परिणामी त्या सुजतात. वाहतूक प्रदूषणातून बाहेर पडणारी अल्ट्राफिनसारखी प्रदूषके रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहात अडथळा आणतात. त्यामुळे हृदयरोगी रुग्णांनी तसंच गरोदर मातांनी सध्याच्या प्रदूषित वातावरणात काळजी घ्यावी.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा