Advertisement

आयसोलेशनसाठी एसआरएची 10 हजार घरं ताब्यात घेण्याची मागणी

मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. रोज रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. रुग्ण ठेवण्यासाठी महानगरपालिका उपाय योजना करत आहेत.

आयसोलेशनसाठी एसआरएची 10 हजार घरं ताब्यात घेण्याची मागणी
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना ठेवण्यासाठी किंवा आयसोलेशनसाठी मुंबईतील एसआरए विभागाकडे तयार असलेली 10 हजार घर ताब्यात घ्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  अनिल गलगली यांनी केली आहे.

मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. रोज रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. रुग्ण ठेवण्यासाठी महानगरपालिका उपाय योजना करत आहेत. पालिकेने आतापर्यंत अनेक शाळा ताब्यात घेतल्या आहे. तसंच मोठी मैदान, स्टेडिअमही ताब्यात घेण्याचा विचार पालिका करत आहेत.

 मुंबईत एसआरएची हजारो घर उपलब्ध झाली आहेत. यापैकी 2080 घर एसआरए ने आधीच दिली आहेत. मात्र आणखी दहा हजार घर ताब्यात घेतल्यास कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला अलगीकरणासाठी उपयोग होऊ शकतो, असं गलगली यांनी म्हटलं आहे.

सध्या महानगरपालिका वानखेडे स्टेडियमवर आदी मैदानांवर आयसोलेशन कक्ष उभारण्याचा विचार करत आहे. पण यासाठी मोठा खर्च आहे. त्याऐवजी ही तयार घर ताब्यात घेतल्यास पालिकेचा खर्च वाचेल, असं अनिल गलगली यांचं म्हणणं आहे.



हेही वाचा -
खासगी नर्सिंग होम, रुग्णालय सुरू न केल्यास होणार कारवाई
नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा