आता कर्करोगाचे निदान केवळ 15 मिनिटांत

 Mumbai
आता कर्करोगाचे निदान केवळ 15 मिनिटांत

मुंबई - पीओसी मेडिकल सिस्टम्स आयएनसीने वेगवान उपकरण आणले आहे. या उपकरणाद्वारे स्तनांच्या कर्करोगाचे निदान लगेच करण्यात येईल. या वेळी अमृता फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, प्रकाश मेहता उपस्थित होते. पीओसी मेडिकल सिस्टिम्सने विकसित केलेले पँडोरा सीडीएक्स हे वेगवान, अचूक तपासणीसाठी उपयोगी ठरणारे यंत्र आहे.

हे यंत्र वापरण्यास अत्यंत साधे आणि सोपे आहे. या यंत्राद्वारे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी चाचणी रक्ताच्या एका थेंबाद्वारे केवळ 15 मिनिटांत केली जाते. याद्वारे भारतातील हजारो महिलांमधील कर्करोगाचे लवकर निदान करता येईल. खेडेगावात जिथे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा रोग अाढळतो अशा ठिकाणी हे उपकरण जास्त उपयोगी ठरणार आहे. या उपकरणाद्वारे सुरूवातीच्या ट्प्प्यातील निदान केले जाईल. याद्वारे लाखो जीव वाचवणे शक्य होईल. पीओसी मेडिकल सिस्टिम्स भारतात मॅमोअलर्टचे अनावरण जूलै 2017ला करण्यात येणार आहे.

या वेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की, कर्करोगाचे निदान अधिक सहज आणि कमी खर्चात होणाऱ्या या सिस्टीमचे मी स्वागत करते. आज अनेक महिला आपल्याला झालेला कर्करोग लपवतात, त्याला कारणीभूत आहेत कर्करोग तपासणेच्या यंत्रणा. या उपकरणामुळे मोठ्या प्रमाणात स्त्रियांना या रोगाचे निदान होण्यास मदत होईल.

Loading Comments