Advertisement

दिव्यांगांकरिता नवी मुंबईत १० जूनला तीन रुग्णालयांत विशेष लसीकरण सत्र

नवी मुंबई महापालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर रांग न लावता ४५ वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिव्यांगांकरिता नवी मुंबईत १० जूनला तीन रुग्णालयांत विशेष लसीकरण सत्र
SHARES

नवी मुंबई महापालिकेच्या (Navi Mumbai Municipal Corporation) कोणत्याही लसीकरण केंद्रावर रांग न लावता ४५ वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना (disabled) प्राधान्याने लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये १८ वर्षावरील दिव्यांग व्यक्ती लसीकरणापासून वंचीत राहू नयेत यासाठी गुरुवार दिनांक १० जून २०२१ रोजी १८ ते ४४ वर्षावरील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण सत्राचं (Special vaccination sessions) आयोजन करण्यात आलं आहे.

 १० जून रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत दिव्यांगांकरिता विशेष लसीकरण सत्रे माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय सेक्टर १५ नेरुळ, राजमाता जिजाऊ रुग्णालय सेक्टर ३ ऐरोली व इ.एस.आय.एस. रुग्णालय सेक्टर ५ वाशी अशा ३ ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील १८ वर्षावरील दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्याकरीता आयोजित करण्यात आलेल्या या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांनी केलं आहे. 

दरम्यान, नवी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. उपचाराधीन रुग्ण पाचशेपेक्षा कमी झाले आहेत. तर १४ काळजी केंद्रांपैकी आठ केंद्रांत सध्या एकही रुग्ण नाही. त्यामुळे इतर केंद्रांतील रुग्ण आता वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रांत हलविले जाणार आहेत. सर्व केंद्रांतील आरोग्य व्यवस्था कायम ठेवत तेथील प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

वाशी प्रदर्शन केंद्रात प्रशासनाने विविध प्रकारच्या १२०० खाटांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या सर्व रुग्णांवर आता एकाच ठिकाणी उपचार करणे शक्य होणार असल्याने इतर केंद्रांतील रुग्णांना वाशी प्रदर्शनी केंद्रात हलविण्यात येणार आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका पाहता या सर्व केंद्रांतील आरोग्य व्यवस्था कायम ठेवण्यात येणार आहे.



हेही वाचा - 

मुंबईच्या चौपाट्यांवर पोलिसांची आता ‘एटीव्ही’वरून गस्त

मुंबई उपनगरातील नागरिकांना दिलासा, गोरेगावमध्ये 'इथं' नवं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा