Advertisement

स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता

पुढील आठवड्यापासून स्पुटनिक व्ही लस मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे.

स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता
SHARES

पुढील आठवड्यापासून स्पुटनिक व्ही लस मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. भारतात स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप दाखल झाली असून दुसरी खेप शुक्रवारी भारतात दाखल होणार आहे.

भारतात स्पुटनिक व्ही लस आली आहे. त्याचबरोबर मला सांगण्यात आनंद वाटत आहे की, ही लस भारतात पुढच्या आठवड्यापासून मिळण्यास सुरुवात होईल. रशियातून आलेल्या लसीची लवकरच विक्री सुरु होईल, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितलं आहे.

१ मे रोजी भारतात स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप आली होती. आता लशीची दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे. भारतात रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लसीस केंद्रीय औषध प्रमाणन आणि नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.

जुलै महिन्यात या लसीचे उत्पादन सुरु होईल, असंही वीके पॉल यांनी सांगितलं. या लसीचे १५.६ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. तर भारतीयांसाठी ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान २१६ कोटी डोस तयार केले जातील. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनं स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी मागितली होती.



हेही वाचा

कोरोना लसीच्या २ डोसमधील अंतर वाढलं, आता इतक्या दिवसांनंतर घ्या दुसरा डोस

भारतीयांना यावर्षीच्या ऑगस्ट ते डिंसेबरमध्ये २१६ कोटी डोस मिळणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा