Advertisement

पालिकेच्या क्षयरोग रुग्णालयाला 36 लाखांची मदत


पालिकेच्या क्षयरोग रुग्णालयाला 36 लाखांची मदत
SHARES
Advertisement

शिवडी - पालिकेच्या क्षयरोग रुग्णालयाला शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांच्या नगरसेवक निधीतून मंगळवारी 36 लाखांचे वैद्यकीय उपकरण देण्यात आलेत. रुग्णांसाठी लवकरच प्रथिनयुक्त आहार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाधव यावेळी म्हणालेत. यावेळी पालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम, म्यूनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सचिव सत्यवान जावकर, रचना आग्रवाल, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एच. डी. ग्वालीन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश केणी, डॉ. ललितकुमार आनंदे आदी उपस्थित होते. शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात भारताच्या कानाकोपऱ्यातून गरीब गरजू रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णांना उत्तम सेवा मिळावी व त्यांचे प्राण वाचावे यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये उपयोगात येईल असे वैद्यकीय उपकरण देण्यात आले आहे. हे उपकरण रुग्णालयाला देताना नगरसेवक अवकाश जाधव म्हणाले की, इथल्या रुग्णांना प्रथिने युक्त आहाराची गरज आहे आणि तो मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर येत्या तीन महिन्यात या रुग्णालयातील समस्या सोडविण्याच्या प्रधान्याने कार्य करण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी दिले.

संबंधित विषय
Advertisement