Advertisement

Coronavirus Updates: कोरोनाची घरी तपासणी, 'या' हेल्पलाइन संपर्क केल्यास मिळणार सल्ला

कोरोना व्हायरसची घरी तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं हेल्पलाइन क्रमांकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Coronavirus Updates: कोरोनाची घरी तपासणी, 'या' हेल्पलाइन संपर्क केल्यास मिळणार सल्ला
SHARES

कोरोना व्हायरसची घरी तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं हेल्पलाइन क्रमांकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळं आता करोनासदृश लक्षणे आढळल्यास संबंधिताला या क्रमांकावर संपर्क साधून डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. यामुळं नागरिकांना कोरोनावर योग्य सल्ले मिळणं सहज शक्य होणार आहे.

सुका खोकला, ताप, थंडी, अशी करोनासदृश्य लक्षणे आढल्यास संबंधित व्यक्तीला महापालिकेच्या ०२२-४७०८५०८५ या हेल्पलाइनवर सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत संपर्क साधू शकता येणार आहे. या हेल्पलाइनवर संपर्क साधून डॉक्टरांशी सल्लामसलत करता येणार आहे. लक्षणे आढळल्यास संबंधित प्रयोगशाळेतील कर्मचारी त्या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत घेऊन जातील आणि अहवाल आल्यानंतर पुढील उपचार ठरेल.

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं या रुग्णांची तपासणी करण्याचा मोठा ताण सध्या महापालिकेच्या रुग्णालांवर येत आहे. असंख्य रुग्ण काळजीपोटी पालिका रुग्णालयांमध्ये जात आहेत. यांपैकी काहींना फक्त साधा ताप किंवा सर्दी-खोकला असल्याचे आढळून आले आहे.

अनेकांना आपलीही कोरोना चाचणी व्हावी, असं अनेक रुग्णांना वाटत आहे. कोरोनाची लक्षणं आढळली तरच तशी चाचणी केली जाते. तरीही अनेक रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेनं हेल्पलाइनची मदत घेतली आहे.



हेही वाचा -

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री 'निम्मी' यांचं निधन

चिंता नको, २ रुपये किलो दराने गहू, तर ३ रुपयांना तांदूळ मिळणार! 



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा