Advertisement

पुढील आठवड्यापासून सरकारी रूग्णालयातील उपचार महागणार

सरकारी रूग्णालयातील सेवा दरांमध्ये ८ वर्षांनी वाढ झाली आहे. हे नवीन दर पुढील आठवड्यापासून लागू होणार असल्याची माहिती वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन संचनालयाचे संचालक डाॅ. प्रविण शिनगारे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

पुढील आठवड्यापासून सरकारी रूग्णालयातील उपचार महागणार
SHARES

खासगी रूग्णालयांकडून रूग्णांची आर्थिक लूट सुरू असतानाच आता सरकारी रूग्णालयातील उपचारही महागणार आहेत. सरकारी रूग्णालयातील सेवा दरांमध्ये ८ वर्षांनी वाढ झाली आहे. हे नवीन दर पुढील आठवड्यापासून लागू होणार असल्याची माहिती वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन संचनालयाचे संचालक डाॅ. प्रविण शिनगारे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. वैद्यकीय सेवांचे दर वाढणार असल्याने राज्यातीलच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून राज्य सरकारच्या रुग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या खिशाला कात्री लागणार आहे.


दरवर्षी वाढ होणं अपेक्षित

दरवर्षी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचं आॅडिट करूत सेवा दरांमध्ये वाढ करणं अपेक्षित असतं. मात्र गेल्या ८ वर्षांत अशी कोणतीही दरवाढ झालेली नव्हती. त्यामुळे यंदा ८ वर्षांचं आॅडिट करूत सेवा दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यासंबंधीचा अध्यादेश २० नोव्हेंबरला काढण्यात आला असून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून होणार आहे.


माफक वाढ?

ही वाढ माफक असल्याने रूग्णांना ही दरवाढ जाचक ठरणार नसल्याचा दावा डाॅ. शिनगारे यांनी केला आहे. सरकारी रूग्णालयामधील रूग्णांपैकी ७० टक्के रूग्ण हे दारिद्रय रेषेखालील अर्थात १ लाख वार्षिक उत्पन्न असलेले असतात. अशा रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. त्यामुळे ७० टक्के रूग्णांवर दरवाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. त्याचवेळी ३० टक्के रुग्णांना नव्या दराप्रमाणे उपचार मिळणार असले, तरी दरात भरमसाठ वाढ झाली नसून हे दर या रूग्णांनाही परवडतील, असंही डाॅ. शिनगारे यांनी स्पष्ट केलं आहे.


'या' रूग्णालयांत उपचार महागणार

सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णालयांमध्येच ही दरवाढ झाली आहे. त्यानुसार मुंबईतील जे. जे. रुग्णालय, सेंट जाॅर्ज, जीटी आणि कामा रुग्णालयामधील उपचार महागणार आहेत. जे. जे. रुग्णालय हे मुंबईतील सर्वात मोठं रुग्णालय असून तिथे रूग्णांच्या रांगा लागलेल्या असतात, देशाच्या कानाकोपऱ्यातून रूग्ण इथं येतात. त्यामुळे या दरवाढीव दराचा रूग्णांना फटका बसेल, असं म्हटलं जात आहे.


'इतके' पैसे मोजावे लागणार

सरकारी रुग्णालयांत सध्या १० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येतात. मात्र पुढील आठवड्यापासून रूग्णांना यासाठी २० रुपये मोजावे लागणार आहेत. रक्तचाचणी आतापर्यंत केवळ ३० रुपयांत व्हायची, पण यापुढे रक्तचाचणीसाठी चक्क २५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर ईसीजीचे दर ३० रुपयांवरून ७० रुपये, सिटीस्कॅनचे दर ३५० रुपयांवरून ३५० ते ७०० रुपये, सोनोग्राफीचे दर १०० रुपयांवरून १२० ते ७०० रुपये करण्यात आले आहेत. तर सर्वात महत्त्वाच्या अशा एमआयआरच्या चाचणीचे दर भरमसाठ वाढवण्यात आले आहेत. सध्या एमआयआरसाठी जिथं रूग्णांना १६०० रुपये भरावे लागतात तिथं यापुढे रूग्णांना चक्क २ ते ३ हजार रूपये भरावे लागणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा