Advertisement

नवजात बालकांसाठी राज्य सरकार 'मिशन थायरॉईड' राबवणार

पर्यायाने नवजात अर्भकाच्या बुद्धीची वाढ खुंटणे, ते गतिमंद होण्याची शक्यता अधिक असते.

नवजात बालकांसाठी राज्य सरकार 'मिशन थायरॉईड' राबवणार
SHARES

गर्भवती महिलांमध्ये थायरॉईड होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले असून अनेकदा मातेकडून नवजात अर्भकाला थायरॉईडची लागण होण्याची शक्यता असते. नवजात अर्भकातील थायरॉईडचे निदान वेळेत न झाल्यास त्याचा परिणाम बाळाच्या मेंदूवर होऊ शकतो.

पर्यायाने नवजात अर्भकाच्या बुद्धीची वाढ खुंटणे, ते गतिमंद होण्याची शक्यता अधिक असते. भावी पिढी सुदृढ व सक्षम असावी यासाठी आता ‘मिशन थायरॉईड’अंतर्गत राज्यातील सर्व नवजात अर्भकांची थायरॉईड तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारे किट रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

नवजात अर्भकांमधील थायरॉईडचे निदान वेळेत न झाल्यास बालकाचे पोट सुटणे, त्याची त्वचा खरखरीत होणे, बुद्धीची वाढ खुंटणे, बालक गतिमंद होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे थायरॉईडचे निदान चार दिवसांमध्ये होणे आवश्यक असते. त्यानंतर निदान झाल्यास बाळावर त्याचे कमी – अधिक प्रमाणात दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

हे दुष्परिणाम टळण्यासाठी जन्माला आलेल्या बाळाची चार दिवसांमध्ये थायरॉईड चाचणी करण्यात येणार आहे. राज्य सरकारने ‘मिशन थायरॉईड’अंतर्गत सर्व वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केलेल्या ‘थायरॉईड बाह्यरुग्ण विभागा’मार्फत ही तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी करण्यासाठी आवश्यक किट सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महिलांची थायरॉईडची तपासणी वेळेवर व्हावी आणि त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने ‘मिशन थायरॉईड’ हाती घेतले आहे. ‘मिशन थायरॉईड’अंतर्गत राज्यातील महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार

महिलांमध्ये थायरॉईड होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे महिलांना त्याबाबत माहिती असावी यासाठी शालेय स्तरावर जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थिनींना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. थायरॉईडची लक्षणे, होणारा त्रास याची माहिती त्यांना देण्यात येणार आहे. तसेच थायरॉईडचा त्रास होत असल्यास त्यांच्यावर जवळील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येतील.



हेही वाचा

Mumbai COVID-19 News: दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी होणारच">Mumbai COVID-19 News: दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी होणारच

केईएम, सायन आणि नायर रुग्णालयांना नवीन अद्ययावत सीटी स्कॅन मशीन मिळणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा