उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या कार्यालयातील वैद्यकीय मदत (medical treatment) कक्षाच्या सहाय्याने राज्यातील 468 चॅरिटेबल रुग्णालयांमध्ये 12,000 हून अधिक खाटा गरीब रुग्णांसाठी (poor) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यांच्यावर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार (subsidy) केले जात आहेत.
गेल्या पाच महिन्यांत कर्करोगावरील उपचार, यकृत, मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि गंभीर शस्त्रक्रियांसह गंभीर रुग्णांवर उपचार करून 258 रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. या रुग्णांना 17 कोटी 69 लाख रुपयांचे उपचार मोफत किंवा सवलतीच्या दरात मिळाले आहेत.
गजानन पुनाळेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, चॅरिटेबल रुग्णालयांमध्ये गरीब (poor) रुग्णांसाठी 10 टक्के खाटा रुग्णालयांकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यानंतर चॅरिटेबल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि पुढे विधी व न्याय विभागातर्फे उपमुख्यमंत्री कार्यालयात वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला. या संदर्भात 31 ऑक्टोबर 2023 रोजी आदेश जारी करण्यात आला आहे.
तसेच जानेवारीपासून विशेष वैद्यकीय मदत डेस्क कार्यान्वित करण्यात आला आहे. रामेश्वर नाईक हे या कक्षाचे प्रमुख आहेत.
चॅरिटेबल रुग्णालयांना 10 टक्के खाटा गरीब आणि गरजू रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक असून, देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विश्वस्त कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयकही मांडले होते आणि त्याला मंजुरी देखील देण्यात आली होती.
विभागीय कार्यशाळा
विधी व न्याय विभागामार्फत सुरू असलेल्या या योजनेची आणि मदत कक्षाची सर्व संबंधित यंत्रणांना माहिती देण्यासाठी मुंबई(mumbai), नागपूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.
चॅरिटेबल रुग्णालयांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर आदींचा यात सहभाग असेल.
मुंबईतील (mumbai) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नुकतीच एक कार्यशाळा झाली. यावेळी विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.
योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?
● ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजार आहे त्यांच्यासाठी मोफत उपचार आहे. तसेच इतर गरीब रूग्णांवर 50% सवलतीच्या दराने उपचार करण्यात येणार आहे.
● या योजनेंतर्गत राज्यातील 468 चॅरिटेबल रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर (patients) उपचार केले जाऊ शकतात, ज्यात पुण्यातील कोकिलाबेन, रिलायन्स, सह्याद्री आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयांचा समावेश आहे.
● चॅरिटेबल रुग्णालयांना 10 टक्के खाटा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. खाटांची संख्या आणखी देखील वाढू शकते.
● आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड किंवा ओळखपत्र, रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा पुरावा, डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन)
कुठे संपर्क साधावा?
● उपमुख्यमंत्री कार्यालय विशेष वैद्यकीय मदत डेस्क, मंत्रालय
● वेबसाइट : charityhelp.demo@maharashatra.gov.in
● जिल्हाधिकारी कार्यालय
● शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
● चॅरिटेबल रुग्णालय
हेही वाचा