आता केवळ ४० हजारांत स्टेंट, तर ९० हजारांत गुडघ्याचं प्रत्यारोपण!

हृदयरोगावर होणाऱ्या शस्त्रक्रियेचा खर्च रूग्ण आणि त्याच्या कुटुंबियांच्या जीवाला घोर लावतो. पण आता काळजी करायची गरज नाही. कारण केंद्र सरकारने 'मोदी केअर हेल्थ केअर स्किम' योजनेची घोषणा केली असून या घोषणेनुसार देशातील अंदाजे १० कोटी कुटुंबांना ५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे.

  • आता केवळ ४० हजारांत स्टेंट, तर ९० हजारांत गुडघ्याचं प्रत्यारोपण!
  • आता केवळ ४० हजारांत स्टेंट, तर ९० हजारांत गुडघ्याचं प्रत्यारोपण!
SHARE

हृदयरोग म्हटलं की सर्वसामान्य रुग्णाच्या आणि रूग्णांच्या नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकतो. हृदयरोगासारखा मोठ्या आजाराची चिंता असतेच; पण त्याचबरोबर हृदयरोगावर होणाऱ्या शस्त्रक्रियेचा खर्च रूग्ण आणि त्याच्या कुटुंबियांच्या जीवाला घोर लावतो. पण आता काळजी करायची गरज नाही. कारण केंद्र सरकारने 'मोदी केअर हेल्थ केअर स्किम' योजनेची घोषणा केली असून या घोषणेनुसार देशातील अंदाजे १० कोटी कुटुंबांना ५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे. तर या योजनेंर्गत १३५२ प्रकारांच्या शस्त्रक्रिया आणि चाचण्यांच्या किंमती केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आल्या आहेत.


बायपासची किंमत निश्चित

हृहयरोग शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी म्हटलं की ३ ते ५ लाखांचा फटका असं आतापर्यंत डोक्यात धरून चालावं लागत होतं. पण या योजनेअंतर्गत खर्चाची चिंता दूर झाली असून आता केवळ ४० हजार रुपयांत स्टेंट बसवता येणार आहे. तर बायपाससाठी १ लाख १० हजार रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे.मनमानी वसुलीला चाप

गुडघ्यांच्या प्रत्यारोपणासाठी रूग्णालय आणि डाॅक्टरांकडून आव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जात होती. या प्रकारालाही चाप बसणार आहे. कारण या योजनेत गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचाही समावेश आहे. गुडघा प्रत्यारोपणासाठी रूग्णांना केवळ ९० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे हा निर्णय गरीब रूग्णांसाठी मोठा दिलासादायक मानला जात आहे.


रुग्णालयांना नोंदणी आवश्यक

'नॅशनल हेल्थ प्रोक्टेक्शन मिशन'अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेंर्गत गरीब रूग्णांसाठी जी रुग्णालये या किंमतींमध्ये शस्त्रक्रिया करून देऊ शकतात त्या रुग्णालयांना केंद्राच्या संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. अशा नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये विमाधारक रुग्णांना सरकारनं निश्चित केलेल्या शस्त्रक्रियेतील यादीमधील शस्त्रक्रियेसाठीची निश्चित रक्कम सरकारकडून अदा केली जाईल.खर्चात तफावत राहणार

रुग्णांना एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागणार आहे की, ४० हजारांत स्टेंट बसवणं वा ९० हजारांत गुडघा प्रत्यारोपण करणं खासगी रूग्णालयांसाठी एेच्छिक असणार आहे. कारण जी खासगी रुग्णालये या किंमतींसह शस्त्रक्रिया करण्यास तयार होतील त्यांना १० ते ३० टक्क्यांपर्यंत इन्सेंटीव्ह देण्यात येईल. त्यामुळे सरसकट सर्व रूग्णालयांमध्ये ४० हजारांत अँजिओप्लास्टी वा ९० हजारांत गुडघा प्रत्यारोपण होणार नाही हे रूग्णांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये आणि केंद्राकडे नोंदणी केलेल्या रुग्णालयांमध्येच या किंमतीत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.


कमी किंमतीत कसं शक्य?

याविषयी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. विजय सुरासे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या योजनेचं स्वागत केलं आहे. सरकारी रुग्णालयात कमी किंमतीत रुग्णांवर शस्त्रक्रिया करणं आता सहज शक्य होईल. पण खासगी रुग्णालयांना इतक्या कमी किंमतीत या शस्त्रक्रिया करणं शक्य होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.


खासगी रुग्णालयांकडून कमी शक्यता

कारण अँजिओप्लास्टीसाठी जी काही उपकरणं खासगी रुग्णालयांमध्ये वापरली जातात ती अत्यंत महागडी आणि नवीकोरी असतात. त्यामुळे खासगी रुग्णालये या किंमतीत शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे येणार नसल्या तरी सरकारी रुग्णालयांमध्ये मात्र रुग्णांना कमी किंमतीत शस्त्रक्रिया उपलब्ध होणार असल्यानं ही चांगली बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारकडून या योजनेसाठी लवकरच एक नवीन पोर्टल तयार केलं जाणार असून त्यावर यासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

शस्त्रक्रियाखर्च
गुडघा प्रत्यारोपण९० हजार  रु.
स्टेंट४० हजार  रु.
बायपास१ लाख १० हजार  रु.
वाॅल्व्ह प्रत्यारोपण१ लाख २० हजार  रु.
अाॅर्थोस्कोपी२० हजार  रु.
हिप प्रत्यारोपण९० हजार  रु.
संक्रमित गुडघ्याची शस्त्रक्रिया२५ हजार  रु.
सर्वाइकल शस्त्रक्रिया२० हजार  रु.हेही वाचा-

महापालिकेच्या रुग्णालयातही होणार रोबोटिक शस्त्रक्रिया?

वाडियामध्ये तिसरी सयामी शस्त्रक्रिया यशस्वीसंबंधित विषय
ताज्या बातम्या