Advertisement

महापालिकेच्या रुग्णालयातही होणार रोबोटिक शस्त्रक्रिया?


महापालिकेच्या रुग्णालयातही होणार रोबोटिक शस्त्रक्रिया?
SHARES

खासगी रुग्णालयात उपलब्ध असणारी रोबोटिक शस्त्रक्रिया आता मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातही उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे. पालिका रुग्णालयांत रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका सईदा खान यांनी स्थायी समितीत प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर पालिका रुग्णालयातील अधिष्ठातांचा गट विचार करून निर्णय घेईल.  ही शस्त्रक्रिया अधिक खर्चिक असल्यामुळे प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होईल का, याबाबत दाट शक्यता अाहे. शिवाय, रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रशिक्षणही क्लिष्ट असल्याकारणाने या सर्व प्रक्रियेसाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागेल, त्यामुळे अजूनही यावर विचार सुरु असल्याचं, पालिकेच्या तिन्ही रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केलं आहे. 

रोबोटिक शस्त्रक्रियेचा कॅन्सर, लिव्हर सर्जरी अश्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी उपयोग होतो. त्यामुळे ही मशीन महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात असेल तर त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात रुग्णांना होईल यात काही शंका नाही. त्यानुसार, प्रत्येक रुग्णालयात ही मशीन आणली तर काही हरकत नाही. शिवाय, सर्वच रुग्णांना या शस्त्रक्रियेचा वापर होत नाही, असंही डॉ. सुपे यांनी स्पष्ट केलं आहे.



या रोबोटिक शस्त्रक्रियेच्या प्रस्तावासाठी महापालिकेच्या रुग्णालयातील अधिष्ठातांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचं नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी स्पष्ट केलं आहे.


हा प्रस्ताव एका नगरसेविकेने पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मांडला होता. पण अजूनही फक्त विचार आणि चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चेसाठी एका वर्षाचा कालावधी जाईल. पण, आम्ही प्रयत्नशील आहोत.

- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय



हेही वाचा-

राज्यातली पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया मुंबईत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा