Advertisement

३० विद्यार्थ्यांसह शिक्षकाला कोरोना, पालघरमधील आश्रमशाळा सील

पालघजवळील नंडोरे आदिवासी आश्रमशाळेतील ३० विद्यार्थी आणि एका शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने ही आश्रमशाळा ताबडतोब सील केली आहे.

३० विद्यार्थ्यांसह शिक्षकाला कोरोना, पालघरमधील आश्रमशाळा सील
SHARES

पालघजवळील नंडोरे आदिवासी आश्रमशाळेतील ३० विद्यार्थी आणि एका शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने ही आश्रमशाळा ताबडतोब सील केली आहे.

आश्रमशाळेत नववी ते बारावीचे वर्ग सुरू असताना काही विद्यार्थ्यांमध्ये ताप, सर्दी आणि खोकला या प्रकारची लक्षणं आढळून आली. त्यानंतर संबंधित वर्गातील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केल्यावर या चाचणीत ९ विद्यार्थी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर १९३ विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी ३० विद्यार्थी कोरोना पाॅझिटिव्ह निघाले तर या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असलेल्या एका शिक्षकालाही कोरोनाची लागण झाली आहे. काही विद्यार्थ्यांना उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात तर, इतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगिकरण कक्ष स्थापन करून वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील विनवल आश्रमशाळेतील ३८ विद्यार्थी आणि ३ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. जव्हार शहरापासून १२ किमी अंतरावर ही बारावीपर्यंतची शासकीय आश्रमशाळा आहे. पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला असताना पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

पालघर जिल्ह्यात १७ मार्च २०२१ पर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६,९६७ इतकी नोंदवण्यात आली असून सध्या ७२९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४५,०३१ इतके कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊ घरी परतले आहेत. तसंच कोरोनामुळे १२०७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

(students and teachers found covid 19 positive in palghar district ashram school)


हेही वाचा-

शासकीय वसतिगृहांना मिळालं 'हे' नवं नाव

कोविड रुग्णसंख्येसोबतच ऑक्सिजनचा वापरही वाढला


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा