Advertisement

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत ८ कोटी लोकांचे सर्वेक्षण


'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत ८ कोटी लोकांचे सर्वेक्षण
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी व नागरिकांना योग्य उपचार मिळण्यासाठी महापालिका अनेक शर्तीचे प्रयत्न करत आहे. त्याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमे सुरू केली. या मोहिमेंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वाच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणारी ही मोहीम केवळ शासकीय नसून लोकचळवळ असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.

मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून या मोहिमेच्या जिल्हा परिषदांमार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी सारी व आयएलआय रुग्ण अधिक काटेकोरपणे शोधावे तसेच सर्वेक्षण पथकांचे अहवाल दररोज विस्तार अधिकारी व इतर वरिष्ठ यंत्रणांनी तपासावेत. ही मोहीम केवळ शासन राबवीत नसून लोकांची आहे. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे या दृष्टीने जनजागृती करावी, मोहिमेत अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवून ती अधिक परिणामकारक करावी, असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील ३४ जिल्ह्यातील ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत आरोग्य सर्वेक्षण झाले आहे. एकूण २४ लाख कुटुंबांना पथकांनी भेटी दिल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा परिषदांना १ कोटी ८४ लाख कुटुंबांना भेटीचे उद्दिष्ट दिले आहे पैकी २४ लाख कुटुंबांना भेटी झाल्या असून १३ टक्के उद्दिष्ट पार पडले आहे. यात सारी आणि आयएलआयच्या १५ हजार ३९२ रुग्ण तर कोविडचे ६ हजार ९३८ रुग्ण आढळले. सहव्याधी असलेल्या २ लाख ६ हजार २११ व्यक्ती आढळल्या.

सर्वेक्षण झालेल्या लोकसंख्येत पुणे, नाशिक, कोल्हापूरमधून सर्वाधिक कोविड रुग्ण आढळले. ठाणे भागामधून २१ टक्के, नाशिक भागामधून १० टक्के, पुणे १८ टक्के, कोल्हापूर १५ टक्के, औरंगाबाद १२ टक्के, लातूर १३ टक्के, अकोला १३ टक्के आणि नागपूर भागामधून ६ टक्के इतक्या कुटुंबांचे सर्वेक्षण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा