Advertisement

‘स्वाईन फ्लूचा अहवाल दर आठवड्याला सादर करा’ - डाॅ. सावंत


‘स्वाईन फ्लूचा अहवाल दर आठवड्याला सादर करा’ - डाॅ. सावंत
SHARES

मुंबईसह राज्यात साथीच्या आजारांनी थैमान घातला आहे. त्यातही स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पुन्हा राज्यातील प्रत्येक महापालिकेला एकदा कडक निर्देश दिले आहेत.

प्रत्येक महापालिकेने स्वाईन फ्लूच्या रुग्णांची रोजच्या रोज नोंद ठेवून दर आठवड्याला महापालिका आयुक्तांनी त्याचा आढावा घ्यावा. या व्यतिरिक्त महापालिका क्षेत्रात येणाऱ्या खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचीही नोंद ठेवावी, असे निर्देश राज्य आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत.

स्वाईन फ्लू संशयित रुग्णांचा जर खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास त्याचे डेथ ऑडिट महापालिकांनी ठेवावे. दर आठवड्याचा अहवाल आढावा आयुक्तांनी राज्य सरकारकडे सादर करावा, अशा सूचना आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या आहेत.


महाराष्ट्र मलेरियामुक्त करण्यावर भर

राज्यात डासांचे वाढते प्रमाण पाहता त्याची उत्पत्ती थांबवणे हे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यासाठीही पालिकेने प्रभावी उपाययोजना राबवल्या आहेत. राज्यातील डासांचे समूळ उच्चाटन करून महाराष्ट्र मलेरियामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेचा ‘बीएमसी अॅक्ट’ संपूर्ण राज्यात लागू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.


2 ते 3 दिवस ताप असल्यास 

रुग्णाला दोन-तीन दिवस ताप राहिल्यास स्वाईन फ्लूच्या निदानाची वाट न पाहता ऑसेलटॅमीवीरचे उपचार सुरू करण्याचे निर्देश सर्व डॉक्टरांना देण्यात आले आहेत. याशिवाय, ऑसेलटॅमीवीर या गोळ्यांचा पुरेसा साठा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी स्पष्ट केले आहे.


स्वाईन फ्लू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या आजारावर मात करण्यासाठी संशयित वाटणाऱ्या रुग्णांनाही औषध सुरू करण्यात यावे, असे सर्व डॉक्टरांना सुचित करण्यात आले आहे. इतकेच नाहीतर मृतांची नोंद करताना त्यांच्यावर झालेल्या उपचारांची नोंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र


स्वाईन फ्लू रुग्णांसाठी ऑसेलटॉमीवीर हे औषध या आजारावर मात करण्यात यशस्वी ठरतेय का, हे पाहण्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर राबवण्यात येत असल्याची माहितीही डॉ. सावंत यांनी दिली.


हेही वाचा - 

सात महिन्यांत मलेरियाचे 7604 रुग्ण, मुंबईत 2 बळी

स्वाईन फ्लूच्या औषधांसाठी येथे संपर्क साधा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा