• टीबी रुग्णालयातील 'खोकला' आंदोलन स्थगित
  • टीबी रुग्णालयातील 'खोकला' आंदोलन स्थगित
  • टीबी रुग्णालयातील 'खोकला' आंदोलन स्थगित
SHARE

शिवडी - टीबी रुग्णालयात काम करणाऱ्या कामगार, कर्मचारी, डॉक्टर, परिचारिकांना योग्य सुविधा मिळत नाहियेत. त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आलाय. तर अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार लेखी निवेदन देऊनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या माध्यमातून सोमवारी कामगारांनी ‘खोकला’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आंदोलन स्थगित करण्यात आलंय.

"रुग्णालय प्रशासनानं मागण्याचा सविस्तर विचार करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी मागितलाय. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं. येत्या 15 दिवसात कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास पुन्हा खोकला आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियन चिटणीस प्रदिप नारकर यांनी दिलाय. या वेळी उपाध्यक्ष हरिश भोईर आदी युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या