Advertisement

नायरमधे 10 मजली कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार

कर्करुग्णांवरील उपचाराच्या सुविधा वाढविण्याची गरज असल्याचे नामांकित कर्करोगतत्ज्ञांचे म्हणणे आहे.

नायरमधे 10 मजली कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार
SHARES

देशभरातून मोठ्या प्रमाणात कर्करुग्ण उपचारासाठी मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांनी तसेच राज्यातील महापालिकांनीही त्यांच्याकडे कर्करुग्णांवरील उपचाराच्या सुविधा वाढविण्याची गरज असल्याचे नामांकित कर्करोगतत्ज्ञांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात आगामी काळात कर्करुग्णांवरील उपचारासाठी दहा मजली स्वतंत्र ईमारत उभारण्याचे काम सुरु झाले असून २०२६ पर्यंत पूर्ण क्षमतेने येथे कर्करुग्णांवर उपचार केले जातील.

नायर रुग्णालयात १९९८ पासून रेडिओ ऑन्कॉलॉजी विभागाच्या माध्यमातून कर्करुग्णांवर उपचार करण्यात येत असून २००७ मध्ये मेडिकल ऑन्कॉलॉजी विभाग सुरु करण्यात आला होता. २०१३ मध्ये नायर रुग्णालयात केमेथेरपी उपचारासाठी डे- केअर सुविधा सुरु करण्यात आली

मागील तीन वर्षांत सुमारे ७,७०० व्यक्ती व ७०० हून अधिक बालकांवर केमेथेरपी उपचार करण्यात आले आहेत. मागील तीन वर्षांत जवळपास साडेनऊ हजार रुग्णांवर केमेथेरपी उपचार करण्यात आले आहेत.

येथील शल्यचिकित्सा विभागात स्तन, जठर, आतडे, स्वादुपिंड, गर्भाशय, घसा, डोके आदींच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया करण्यात येत असून २०२२ मध्ये ६४४ कर्करुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे येथील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

दिवसेंदिवस नायर रुग्णालयात येणाऱ्या कर्करुग्णांची संख्या लक्षात घेऊन नायरमधील कर्करोग विभागाचा विस्तार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

यासाठी नवीन दहा मजली इमारत उभरण्यात येत आहे. या इमारतीसाठी १०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून एकूण ७० खाटा या रुग्णालयात असतील. यातील ५० खाटा या रेडिओथेरपीच्या रुग्णांसाठी तर २० खाटा केमेथेरपीच्या रुग्णांसाठी असतील. या दहा मजली इमारतीमध्ये दोन लिनर ॲक्सिलेटर मशिन, टेलिकोबाल्ट थेरपी, टेलिथेरपी, ब्रेकीथेरपी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर तसेच पेटस्कॅनपासून अनेक सुविधा असणार आहेत.

पहिल्या मजल्यावर लहान मुलांचा विभाग तसेच चाचण्यांच्या सुविधा असतील, तर दुसऱ्या मजल्यावर पेट स्कॅन असणार आहे. सहाव्या मजल्यावर महिलांसाठी तर सातव्या मजल्यावर पुरुषांसाठी विभाग असेल.

आठव्या आणि नवव्या मजल्यावर लायब्ररी आणि सेमिनार हॉल असून २०२६ पर्यंत हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होईल. 



हेही वाचा

18% मुंबईकर मधुमेहाने त्रस्त : BMC

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा