Advertisement

धक्कादायक! कोरोनाच्या लसी ऐवजी दिली रेबीजची लस

आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गेलेल्या कळवा इथल्या रहिवाशाला चुकून रेबीज प्रतिबंधक लस (ARV) दिल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक! कोरोनाच्या लसी ऐवजी दिली रेबीजची लस
SHARES

आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गेलेल्या कळवा इथल्या रहिवाशाला चुकून रेबीज प्रतिबंधक लस (ARV) दिल्याची घटना समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेनं (tmc) त्या केंद्राच्या डॉक्टर आणि नर्सला निलंबित केलं आहे. महामंडळानं सांगितलं की, ज्या व्यक्तीला रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली होती त्याची प्रकृती स्थिर आहे.

टीएमसीचे अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप माळवी म्हणाले, “संबंधित रुग्ण राजकुमार यादव कळवा पूर्व इथल्या अटकोनेश्वर नगर प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात कोविशील्ड लसीची चौकशी करण्यासाठी गेले होते. केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.राखी तावडे यांनी त्यांना कोविशील्ड लसीसाठी केस पेपर दिले आणि त्यांना रांगेत थांबण्यास सांगितलं.

प्राथमिक आरोग्य केंद्र अटकोनेश्वर आणि जवळच्या झोपडपट्ट्यांच्या इतर सर्व आरोग्यविषयक आजारांची पूर्तता करते. कोविड व्यतिरिक्त, ते इतर लस देखील देतात.

माळवी पुढे म्हणाले, “जेव्हा व्हॅक्सिन घेण्याची त्याची पाळी आली, तेव्हा संबंधित नर्स कीर्ती रयतनं त्यांचे केस पेपर तपासले नाहीत किंवा लसीच्या डोसची माहिती दिली नाही. तिनं गृहीत धरलं की तो एआरव्हीसाठी तिथं आहे. त्यानंतर तिनं लस दिली. रुग्णाला लस दिल्याबद्दल माहिती देणं आणि कोणतीही लस देण्यापूर्वी केस पेपर तपासणं ही नर्स आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची जबाबदारी होती.”

माळवी यांनी माहिती दिली की, त्यांच्या कोणत्याही आरोग्य केंद्रात असं दुर्लक्ष सहन केलं जाणार नाही. “आम्ही दोघांना निलंबित केलं आहे. तावडे यांच्या अंतर्गत या घटनेची देखरेख झाली नाही, रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल त्यांचही निलंबन केलं. यादव यांची प्रकृती स्थिर आहे आणि आम्ही त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहोत.”

टीएमसीच्या एका सूत्रानं सांगितलं की, “लस घेतल्यानंतर यादव यांनी कुठली लस दिली असं विचारलं. नर्सनं त्याला सांगितलं की, ही रेबीज प्रतिबंधक लस आहे, त्यानंतर तो घाबरला आणि म्हणाला की त्याला कोविशील्ड लस मिळणार आहे. त्यांनी स्पष्टीकरणाची मागणी केली, त्यानंतर चौकशी झाली.”

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, हे केंद्र झोपडपट्टीत आहे जिथं बहुतेक लाभार्थी अशिक्षित आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणं वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं कर्तव्य आहे. म्हस्के म्हणाले, “मला घटनेची माहिती मिळाली आणि ताबडतोब चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. आम्ही सहमत आहोत की ती व्यक्ती चुकीच्या रांगेत बसली. पण कर्मचाऱ्यांनी प्रत्येक व्यक्तीला कोणती लस दिली जाते याची माहिती देणं गरजेचं आहे.”

४५ वर्षीय राजकुमार यादव यांनी सांगितलं की, अलीकडेच त्यांच्या खालच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यामुळे त्यांना कोविड लस मिळू शकते का याची चौकशी करायला गेले होते. ते म्हणाले, “मला आता माझ्या हातामध्ये अशक्तपणा आणि वेदना आहेत. मी अलीकडेच माझ्या पाठीवर शस्त्रक्रिया केली आणि डोसबद्दल विचारण्यासाठी केंद्रात गेलो. डॉक्टर म्हणाले मी लस घेऊ शकतो आणि मला केस पेपर दिले. ऑपरेशनमुळे मी उभे राहू शकत नसल्यामुळे, हॉस्पिटलमधील एका व्यक्तीनं मला एका खोलीत जाण्यास सांगितलं.”

त्यानं दावा केला की, परिचारिकेनं त्याला दोन्ही हातांनी पकडले, ज्यामुळे तो संशयास्पद झाला, म्हणून त्याने तिला विचारले की त्याला कोणता डोस दिला आहे. “तिने मला कोणतंही कागदपत्र दाखवायला सांगितलं नाही किंवा मी तिथे कोणत्या डोससाठी आहे हे विचारले नाही. मला कुत्रा चावला नाही तेव्हा त्यांनी मला रेबीजविरोधी लस दिली हे ऐकून मला धक्का बसला. मी स्थानिक नगरसेवकाकडे गेलो आणि माझी समस्या सांगितली.”हेही वाचा

'या' तारखेपासून शिवभोजन थाळीचं मोफत वितरण बंद

मुंबई महापालिका नद्यांच्या सफाईसाठी तब्बल १,३०० कोटी खर्च करणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा