Advertisement

मुंबईकरांनो, थंडी वाजतेय? मग हे करा!


मुंबईकरांनो, थंडी वाजतेय? मग हे करा!
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या तापमानामध्ये वेगाने घट होत आहे. त्यामुळे कायम घामाच्या धारा पुसणारे मुंबईकर सुखद थंडीचा अनुभव घेत आहेत. मात्र, ही थंडी अजून वाढत जाणार असून त्यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. मुंबईच्या वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य सांभाळणं हे मोठं काम मुंबईकरांना करावं लागणार आहे. त्यासाठी काय काळजी घेता येईल, याचे हे काही उपाय -


  • थंडीच्या दिवसांमध्ये घरातून बाहेर पडताना ऊबदार कपडे घाला
  • घरामध्ये शक्य असल्याच ऊबेसाठी शेकोटी पेटवून ठेवा
  • थंडीच्या दिवसांमध्ये दही आणि ताक घेणं टाळा
  • मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी सूर्योदय झाल्यानंतरच बाहेर पडा
  • थंड पाण्यामध्ये जास्त वेळ घालवू नका



एवढं करूनही आजार तुम्हाला त्रास देणार नाहीतच असं काही नाही. त्यामुळे जर आजारी पडलातच, तर हे उपाय करा-

  • दूध-हळद - थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी-खोकला होणं हे सामान्य आहे. त्यासाठी गरम पाण्याचं सेवन करा. शिवाय एक ग्लास दुधामध्ये एक चमचा हळद मिसळून प्या.
  • तुळस, लवंग आणि आलं - तुळशी, लवंग, आलं दूध किंवा चहासोबत मिसळून प्यायल्यास सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळू शकतो.
  • लिंबू आणि मध - दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबांचा रस ग्लासभर उकळत्या पाण्यात किंवा गरम दुधाक मिसळून प्यायल्यास थंडीमुळे होणाऱ्या आजारांना दूर ठेवता येणं शक्य आहे.
  • लसूण - लसणाच्या पाच पाकळ्या तुपामध्ये परतवून खाल्ल्यास सर्दी कमी होऊ शकते.
  • खजूर - खजूर खाण्यासाठी गरम असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये नियमितपणे खजूर खायला हवा. शिवाय गरम दुधामध्ये खजूर खाल्ल्यास सर्दी कमी होऊ शकते.



हेही वाचा

मुंबईकरांनो गुलाबी थंडी अनुभवा, 3 दिवसांत किमान तापमान घटणार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा