Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

मुंबईतील केईएम रुग्णालयात अवयवदान

के. ई. एम. रुग्णालयामध्ये (K.E.M. Hospital) मेंदू मृतावस्थेमध्ये (brain dead) असलेल्या रुग्णांचं अवयवदान (Organ donation)करण्यात आलं आहे. मागील २ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केल्यानंतर रुग्णांचं अवयवदान करण्यात आले.

मुंबईतील केईएम रुग्णालयात अवयवदान
SHARES

मुंबईतल्या परळ येथील के. ई. एम. रुग्णालयामध्ये (K.E.M. Hospital) मेंदू मृतावस्थेमध्ये (brain dead) असलेल्या रुग्णांचं अवयवदान (Organ donation)करण्यात आलं आहे. मागील २ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केल्यानंतर रुग्णांचं अवयवदान करण्यात आले. अवयव प्रत्यारोपणाच्या मोहिमेला (Organ transplantation campaigns) बळ मिळावं यासाठी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडून (Divisional Transplant Coordinating Committee) विविध पातळ्यांवर जनजागृती केली जात आहे. परंतु, खासगी रुग्णालयांइतकं अवयवदानाचं प्रमाण सार्वजनिक रुग्णालयामध्ये अद्याप कमी आहे.

हेही वाचा - आता मित्रांचाही विमा काढता येणार, फ्रेंड इन्शुरन्सला आयआरडीएची मान्यता

५२ वर्षीय रुग्णाला (Patient) स्ट्रोक आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अतिशय गरीब परिस्थितीमधील या रुग्णाच्या वैद्यकीय तपासण्या (Medical Test) करण्यात आल्या. त्यानंतर त्याला मेंदू मृतावस्थेमध्ये (brain dead) असलेल्या अवस्थेत घोषित करण्यात आलं. त्यावेळी रुग्णाच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्यासाठी संमती दिली.

प्रत्यारोपण प्रक्रियेमध्ये रक्ताशी संबधित असलेल्या काही घटकांमुळं मूत्रपिंडांचं दान (Kidney donation) करण्यास समितीकडून मान्यता मिळाली नाही. मात्र, यकृत खासगी रुग्णालयातील गरजू रुग्णाला देण्यात आलं. मेंदू मृतावस्थेमध्ये असलेले ९९ टक्के रुग्ण हे रस्ते अपघातांमध्ये गंभीररीत्या जखमी झालेले असतात.

हेही वाचा - ‘सीएए’च्या समर्थनासाठी नव्हे, तर बांगलादेशींना हाकलण्यासाठी मोर्चा- राज ठाकरे

अतितीव्र पक्षाघात, मेंदूमध्ये (Brain) झालेला रक्तस्राव अशा कारणांमुळं ही काही रुग्ण मेंदूमृत होतात. अशा रुग्णांमध्ये मेंदूचं कार्य बंद झालेलं असतं. त्यामुळं सर्वसामान्यांनी पुढाकार घेऊन ही मोहीम अधिक व्यापक करायला हवी, अशी अपेक्षा केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख (Dr. Hemant Deshmukh) यांनी व्यक्त केली.

मुंबई महापालिकेच्या या के. ई. एम. रुग्णालयातील राज्यभरातील गरजु रुग्णांची मोठी गर्दी असते. अनेक आजारांवर या रुग्णालयात उपाचार होत असल्यानं त्याचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हेही वाचा -

करोना व्हायरसचे ८ संशयित रुग्णालयात, मुंबई विमानतळावर ३९९७ प्रवाशांची तपासणी

यापेक्षा जास्त लोकं लंगरमध्ये जेवतात, ते पण फुकट, ‘शिवथाळी’वरून फडणवीसांचं टीकास्त्रRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा