Advertisement

अम्फन वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसाला जाणाऱ्या ट्रेन रद्द

मजुरांना घेऊन परतणाऱ्या श्रमिक ट्रेन ओडिशा सरकारनं रद्द केल्या आहेत.

अम्फन वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसाला जाणाऱ्या ट्रेन रद्द
SHARES

कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. मोठ्या शहरातून लोक आपापल्या गावी जात आहेत. पश्चिम बंगाल आणि ओडिशामधूनही लाखोच्या संख्येनं तरूण रोजगाराच्या शोधात देशातल्या मोठ्या शहरांमध्ये जात असतात. हेसुद्धा आता आपापल्या घरी परतत आहेत.

मात्र, अम्फनचा धोका बघता १८ ते २१ मे दरम्यान मजुरांना घेऊन परतणाऱ्या श्रमिक ट्रेन ओडिशा सरकारनं रद्द केल्या आहेत.

२१ मे २०२० पर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी तीन श्रमिक स्पेशल गाड्या रद्द करण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारनं अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केली आहे. बुधवारी सुपर चक्रीवादळचा अम्फानला फटका बसला. महाराष्ट्र सरकारला पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत गाड्या पाठवण्यास मान्यता मिळाली नाही.

प्रत्येक श्रमिक गाड्यात सरासरी १ हजार ५०० प्रवासी प्रवास करतात.गाड्या रद्द झाल्यानं या प्रवाशांनी कोणत्याही स्थानकात धाव घेऊ नये, असं आवाहन सरकारनं केलं आहे.

‘उम-पुण’ म्हणून उच्चारलेला ‘अम्फन’ हा शब्द थाईपासून आला असून त्याचा अर्थ “आकाश” आहे. हे नाव थायलंडनं २००४ मध्ये सुचवलं होतं. ही नावे जागतिक हवामान संस्था (डब्ल्यूएमओ)च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आशिया आणइ पॅसिफिकच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाच्या विशेष एजन्सीच्या सदस्य देशांच्या यादीतून निवडली गेली आहेत.

दरम्यान चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी प्रवेशबंदी केलेली आहे. राज्य सरकारने या लोकांची व्यवस्था इतर जिल्ह्यांमध्ये करावी, अशी विनंती या अधिकाऱ्यांनी केली आहे.

110 किमी वेगानं अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात सुसाट्याचा वारा सुरू आहे. आतापर्यंत या वादळानं तीन बळी घेतले आहेत. पश्चिम बंगालमध्ये दोन जण तर ओडिशामध्ये एका मुलीचा या वादळामुळे मृत्यू झाला आहे.

ओडिशातील भद्रक आणि बालासोर भागात जोरात हवा सुरू आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण 24 परगना, पूर्व मिदनापूर या भागात लॅंड फॉल झाले आहेत. म्हणजेच या वादळाने जमिनी भागाला नुकसान पोहोचवलं आहे. ओडिशात अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि प्रचंड पावसाला सुरुवात झाली आहे.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा