राज्यात साथीच्या आजारांचं प्रमाण अधिकच


SHARE

मुंबईसह राज्यभरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजार वाढले आहेत. त्यामुळं अनेकांना डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत होता. परंतु, आता पावसाळा संपला असला तरी साथीच्या आजारांचं प्रमाण कमी झालेलं नाही. त्याशिवाय, बदलत्या वातावरणामुळं जंतूसंसर्गाचा धोका वाढत आहे. जीवनशैली आणि आहारानं सामान्यांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. त्यामुळं राज्यात डेंग्यू आणि मलेरियाचे प्रमाण वाढत आहे.

डॉक्टरांचा सल्ला

या साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी वेळीच खबरदारी घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं सांगितलं जात आहे. राज्याभरात यंदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत मलेरियाच्या १० हजार ७२६ रुग्णांची तर, डेंग्यूच्या ९ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, पुण्यात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणं मागील वर्षांच्या सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांतील रुग्णांपेक्षा आता या आजारांचे प्रमाण वाढल्याचंही दिसून आलं आहे.

हेही वाचा - स्वाइन फ्लूचे राज्यात २४० बळी, मुंबईत ६ जणांचा मृत्यू

डेंग्यूचं निदान

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यात २ हजार ४७ डेंग्यू रुग्ण आढळले होते, तर यंदा २ हजार ७५५ रुग्णांची नोंद करण्यात आली. आॅक्टोबरमध्ये मागील वर्षी २ हजार १८३ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, या वर्षी २ हजार २७८ रुग्णांना डेंग्यूचं निदान झालं आहे. पुण्यात डेंग्यूचं सर्वाधिक म्हणजे १ हजार ९६१ रुग्ण असून कोल्हापूरमध्ये १ हजार २८१ तर नाशिक, सांगलीमध्ये अनुक्रमे ६८२, ४८० रुग्ण आढळून आले.

हेही वाचा - जे.जे. रुग्णालयात आता बिल ऑनलाइन भरता येणार

उपचार सुरू

मुंबई शहर उपनगरात आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे १०९ तर, मलेरियाच्या २४० रुग्णांची नोंद झाली. तसेच या कालावधीतील १ हजार ९७० डेंग्यूसदृश्य रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. यंदाच्या वर्षभरात मलेरियाचं राज्यात १० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर मलेरियामुळं १३ जणांना जीव गमवावा लागला आहे.हेही वाचा -

मध्य रेल्वेकडून 'इतक्या' मुलांची घरवापसी

यूजीसी ठेवणार विद्यार्थ्यांच्या करिअरचीही माहितीसंबंधित विषय
ताज्या बातम्या