Advertisement

मुंबईत प्रत्येक वाॅर्डमध्ये होणार तीन लसीकरण केंद्र

मुंबईकरांना आता घराजवळच कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध हाेणार आहे. मुंबई पालिका मुंबईतील २४ वाॅर्ड मध्ये लसीकरणाच्या केंद्रांमध्ये वाढ करणार आहे.

मुंबईत प्रत्येक वाॅर्डमध्ये होणार तीन लसीकरण केंद्र
SHARES

मुंबईकरांना आता घराजवळच कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध हाेणार आहे. मुंबई पालिका मुंबईतील २४ वाॅर्ड मध्ये लसीकरणाच्या केंद्रांमध्ये वाढ करणार आहे. यानुसार आता प्रत्येक वाॅर्डमध्ये तीन लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईसह राज्यात मंगळवारपासून पुन्हा कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण केलं जातं आहे.  मुंबईत लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी कोविनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लसीकरण दोन दिवस स्थगित करण्यात आलं होतं. मुंबईत चार दिवस लसीकरण कार्यक्रम असेल. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार लस दिली जाईल. मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज ४००० जणांना लस देण्यात येईल. 

मुंबईत पहिल्या टप्प्यात १.२५ लाख आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाइन कर्मचारी व तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षापुढील  नागरिकांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यासाठी पालिका प्रशासन आतापासूनच लसीकरण केंद्रात वाढ करत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं की, पालिका प्रत्येक वाॅर्ड सेंटर स्तरावर लसीकरण केंद्र सुरु करणार आहे. प्रत्येक वाॅर्डमध्ये तीन लसीकरण केंद्र सुरु केली जाणार आहेत. २४ वाॅर्ड मध्ये ७२ केंद्र तयार केली जाणार आहेत. ही केंद्रे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी असणार आहेत. यासाठी १० हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लसीकरणाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या केंद्रामुळे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील व्यक्तींना त्यांच्या घराजवळच लसीकरणाची सुविधा उपलब्ध हाेणार आहे.हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू होणार सीबीएसई बोर्ड

महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसवर सीसीटीव्हीची नजरRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा