Advertisement

आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताह : कामा रुग्णालयात चित्र प्रदर्शनाचं अायोजन


आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताह : कामा रुग्णालयात चित्र प्रदर्शनाचं अायोजन
SHARES

नवजात बालकांसाठी मातेचं दूध हे अमृतासारखं असते. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यात बाळाला आईचं दूध मिळणं गरजेचं आहे. याचंच महत्व पटवून देण्यासाठी कामा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताहनिमित्त चित्रप्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. या प्रदर्शनात कॉर्पोरेट आयुष्य जगणाऱ्या महिलाही आपल्या बाळाला वेळोवेळी कशा प्रकारे दूध पाजू शकतात, याची माहिती चित्रांच्या माध्यमातून देण्यात अाली अाहे.  

कामा रुग्णालयात हे प्रदर्शन गेल्या ७  वर्षांपासून अायोजीत केलं जात अाहे.  कामा रुग्णालयातील परिचारिका आणि विद्यार्थिनींकडून प्रबोधनपर व्याख्याने अायोजीत करून चित्रे आणि वेगवेगळ्या स्लोगनचे प्रदर्शन भरवले जाते. बुधवारपासून सुरू झालेलं हे प्रदर्शन ७ दिवस चालणार अाहे.


स्तनपानाबद्दल चुकीचे समज


चेटकिणीचं दूध
आईचं पहिलं दूध हे चेटकिणीचं 
दूध असतं असं आधी म्हटलं जायचं.  परिणामी हे दूध फेकलं जायचं. मात्र, आईच्या पहिल्याच दुधात पोषक सत्वे असतात आणि हे दूध मिळाल्यास बाळाची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होते, हे विज्ञानाने सिद्ध केलं अाहे.

 पाण्याचं प्रमाण कमी
आईच्या दुधात पाण्याचं प्रमाण कमी असतं हा कित्येक जणांचा गैरसमज असतो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी बाळाला दुधाव्यतिरिक्त बदामाची भूकटी, मध, पाणी पाजलं जातं. पण असं न करता आईचं दूध आहे तसंच द्यावं.

आईची तब्येत खालावते
स्तनपानाने आईची तब्येत खालावते किंवा बांधा स्थूल होतो असं देखील म्हटलं जातं. पण आई जर बाळाला दूध पाजत असेल तर त्यामुळे अाईचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ संतुलीत राखायला मदत होते. सरकारी महिला कर्मचाऱ्यांना बाळाच्या संगोपनासाठी ६ महिन्यांची प्रसूती रजा मिळते. मात्र, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आपल्या बाळाकडं तितकसं लक्ष देता येत नाही. प्रसूती झालेल्या मातेला कामानिमित्त बाहेर पडावं लागत असेल तर मातेने एक स्वच्छ भांड्यात आपलं दूध काढून थंड करण्यासाठी ठेवावे. त्यानंतर बाळाच्या देखभालीसाठी जे असतील त्यांनी हे दूध न उकळवता बाळाला पाजावे. स्तनपान हे बाळासाठी संजीवनीसारखं अाहे. प्रसूतीनंतर लगेचच बाळाला दूध देणं गरजेचं आहे. या दूधात  व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि अन्य जीवनसत्त्वे असल्याने बाळाला हे दूध मिळणं महत्वाचं आहे.
- डॉ. राजश्री कटके, वैद्यकीय अधिक्षक, कामा रुग्णालयहेही वाचा -

महिलेच्या पोटातून काढली १० किलोची गाठ 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा