Advertisement

आता घरीच होऊ शकणार कोरोनाची चाचणी

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (USFDA)नं पहिल्या सेल्फ कोविड टेस्ट किटला मंजूरी दिली आहे.

आता घरीच होऊ शकणार कोरोनाची चाचणी
SHARES

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (USFDA)नं पहिल्या सेल्फ कोविड टेस्ट किटला मंजूरी दिली आहे. या किटच्या माध्यमातून घरीच कोरोना टेस्ट केली जाऊ शकते. या माध्यमातून ३० मिनिटांत रिजल्ट मिळतो. घरीच रिजल्ट देणारी ही पहिलीच किट आहे.

USFDA कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या सिंगल यूज टेस्ट किटची निर्मिती ल्यूकिरा हेल्थनं केली आहे. या किटच्या माध्यमातून स्वतः नाकातून स्वॅब सँपल टेस्ट केली जाऊ शकते. USFDA नुसार, १४ वर्षे किंवा यापेक्षा मोठे लोक या किटच्या माध्यमातून कोरोनाची टेस्ट करू शकतात. मात्र १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींच्या टेस्टसाठी सँपल एखाद्या हेल्थ वर्करनंच घ्यावे.

USFDA चे कमिश्नर स्टीफन हान यांनी म्हटलं आहे की, आतापर्यंत घरी जाऊन कोविड-19 टेस्टचे सँपल घेण्यासाठी परवानगी होती. याचा रिजल्ट नंतर यायचा. ही पहिली अशी किट आहे, ज्याचा वापर स्वतः केला जाऊ शकतो आणि घरीच रिजल्ट देते. किटचा वापर रुग्णालयांमध्येही केला जाऊ शकतो.

अमेरिकेनं सर्व नागरिकांच्या लसीकरणाच्या योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. पुढच्या महिन्यापासून हे अभियान सुरू होईल आणि आशा आहे की, डिसेंबरच्या अखेरपर्यंत जवळपास दोन कोटी लोकांना लस दिली जाऊ शकते.

एप्रिलपर्यंत इथं व्हॅक्सीनचे ७० कोटी डोज तयार होतील. या हिशोबानं अमेरिकेच्या सर्व नागरिकांना लस देण्याचे काम एप्रिल ते जुलै या काळात पूर्ण होईल. मॉडर्ना आणि फायजरने जी व्हॅक्सिन तयार केली आहे त्याचे दोन डोज एका व्यक्तीला द्यावे लागतील.


हेही वाचा

"प्रार्थनास्थळं पुन्हा सुरू झाल्यानं कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यास आरोग्य यंत्रणा सज्ज"

भायखळा, परळमध्ये कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा