Advertisement

"प्रार्थनास्थळं पुन्हा सुरू झाल्यानं कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यास आरोग्य यंत्रणा सज्ज"

महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं म्हटलं आहे.

"प्रार्थनास्थळं पुन्हा सुरू झाल्यानं कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यास आरोग्य यंत्रणा सज्ज"
SHARES

महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक म्हणाले की, राज्यातील मंदिरे पुन्हा भाविकांसाठी सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यास आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.

यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारनं आठ महिन्यांनंतर प्रार्थनास्थळं सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याबद्दल बोलताना मलिक यांनी पुढे म्हणाले की, प्रार्थनास्थळांमध्ये सामाजिक अंतर कायम ठेवण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक तत्त्वं जारी केली गेली आहेत. लोकांना सावध राहण्यास सांगितलं आहे. तसंच रुग्णांमध्ये वाढ झाल्यास आरोग्यविषयक योग्य सुविधा पुरवल्या जातील.

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या प्रमाणित कार्यप्रणाली (SOP)नुसार कंटेनमेंट झोनमधील धार्मिक स्थळांना अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या वेळेनुसार पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या वेळेतच भाविकांना दर्शनाची परवानगी असेल.  

केंद्र सरकारनं प्रार्थनास्थलांना उघडण्याची परवानगी दिली असून देखील राज्य सरकारनं यापूर्वी मंदिरं सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून ठाकरे सरकाररवर टिका करण्यात आली होती. त्यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रार्थनास्थळांमध्ये सामाजिक अंतर पाळणे कठीण असल्याचं सांगून आपला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, या मुद्दय़ावरून ठाकरे आणि राज्यपाल बी. एस. कोश्यारी यांच्यातही वाद निर्माण झाला होता.



हेही वाचा

भायखळा, परळमध्ये कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक

दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या अधिक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा