Advertisement

दिव्यांगांसाठी १७ जूनला नवी मुंबईतील ३ रुग्णालयांत लसीकऱण

नवी मुंबई महापालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना रांग न लावता प्राधान्याने लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी १७ जूनला नवी मुंबईतील ३ रुग्णालयांत लसीकऱण
SHARES

हवामान विभागाच्यावतीने १० ते १२ जून या कालावधीत दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे १० जून रोजी नवी मुंबईत होणारं दिव्यांगांसाठीचं (disabled) विशेष लसीकरण (special vaccination) रद्द करण्यात आलं होतं. मात्र, आता नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) पुन्हा दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण सत्राचं आयोजन केलं आहे. 

१८ ते ४४ वर्षावरील दिव्यांगांसाठीचे विशेष लसीकरण सत्र आता गुरुवार १७ जून रोजी होणार आहे. हे विशेष लसीकरण सत्र सकाळी ९ ते ५ या वेळेत माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय सेक्टर १५ नेरुळ, राजमाता जिजाऊ रुग्णालय सेक्टर ३ ऐरोली व इ.एस.आय.एस. रुग्णालय सेक्टर ५ वाशी अशा ३ ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना रांग न लावता प्राधान्याने लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर १८ वर्षावरील दिव्यांग व्यक्ती कोव्हीड लसीकरणापासून वंचीत राहू नयेत यासाठी हे लसीकरण सत्र होत आहे. या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे. 

दरम्यान, उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं (student) कोविड लसीकरण न झाल्यामुळे अडचण होऊ नये व त्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) बुधवारी १६ जून रोजी विशेष लसीकरण सत्र (Special vaccination session ) आय़ोजीत केलं आहे. त्यानुसार सकाळी ९ ते ५ या वेळेत सेक्टर १५ नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात हे विशेष लसीकरण सत्र होणार आहे.

 


हेही वाचा -

शाब्बास धारावीकर! सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णसंख्या

पेट्रोल पुन्हा महागलं; मुंबई-पुण्यात प्रति लिटर १०२ पार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा