भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट देणे लहानेंना भोवले

 Pali Hill
भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट देणे लहानेंना भोवले

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी जे जे रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांना दोषी ठरवण्यात आले आहे. मुंबईतील पीएमएलए कोर्टाने हा निर्णय दिला आहे. कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका लहानेंवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षेचा निर्णय पीएमएलए कोर्टाने मुंबई हायकोर्टाकडे सोपवला आहे.

छातीत दुखायला लागल्यानंतर छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर जे जे रुग्णालयातच उपचार होणे आवश्यक होते. पण तसे न होता त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट करण्याचा निर्णय परस्पर घेण्यात आला. तात्याराव लहाने यांच्या शिफारशीमुळे छगन भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

Loading Comments