Advertisement

हृदयविकार बालकांना वाचवण्यासाठी 'या' स्पर्धेत सहभागी व्हा!


हृदयविकार बालकांना वाचवण्यासाठी 'या' स्पर्धेत सहभागी व्हा!
SHARES

मुंबईतील बाल उपचारासाठी प्रसिद्ध असलेलं वाडिया रुग्णालय! या रुग्णलयातर्फे नेहमी सामाजपयोगी उपक्रम राबवले जातात. त्याप्रमाणे आता या रुग्णालयातर्फे हृदयदोष असलेल्या लहान मुलांसाठी लीटील हार्ट मॅरथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. गेली चार वर्षे ही मॅरथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. विशेष म्हणजे या मॅरथॉनच्या माध्यामतून जमा होणारी रक्कम हृदयदोष असलेल्या बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी वापरून त्यांना नवं जीवनदान देण्यात येतं.



'हृदय वाचवा जीव वाचवा'

भारतात सध्या अनेक हृदयविकारग्रस्त बालके शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात एकट्या मुंबईत ५०० तर वाडिया रुग्णालयात सध्या १०० बालके या शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. या बालकांना मदत म्हणून जानेवारी महिन्यात ही मॅरथॉन “हृदय वाचवा जीव वाचवा“ या ब्रीद वाक्याखाली आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये नाव नोंदणीसाठी शेवटची तारीख ही २५ डिसेंबर असून, वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर पार पडणार आहे. यामध्ये ७ ते १८ वयोगटातील मुलं सहभाग घेऊ शकातात.


३०० ते ५०० बालकांवर शस्त्रक्रिया

गेल्यावर्षी झालेल्या मॅरथॉनमधून जमा झालेल्या रकमेतून वाडिया रुग्णालयानं एकूण २५० हृदयदोष असलेल्या बालकांच्या यशस्वी शस्त्रक्रीया पार पडल्या. त्यातील एका शस्त्रक्रियेला २ लाख इतका खर्च आला होता. तर यंदा ३०० ते ५०० बालकांवर शस्त्रक्रिया करण्याचं या रुग्णालयाचं ध्येय असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या परिषदेत देण्यात आली.

आम्ही आता पर्यंत २०० लोकांची शस्त्रक्रिया केली आहे आता आमचा टार्गेट ५०० आहे. गेली ९१ वर्षे वाडिया रुग्णालयातर्फे आम्ही लोकांची मोफत सेवा करतो. याचा मला खूप आनंद होत आहे. ही सेवा हळूहळू देशात पसरवणार आहे. सध्या युपी आणि बिहारचे लोक जास्त येत आहेत. या मॅरथॉनमध्ये जी लहान मुले सहभागी घेतात ते आमच्यासाठी स्टार आहेत.
- नेस वाडिया, उद्योजक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा