62 व्या वाढदिवशी 62 लाखांचे दान


  • 62 व्या वाढदिवशी 62 लाखांचे दान
SHARE

सायन - जे.के.शाह या मुंबईतील व्यावसायिकांनं लग्नाच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला 62 लाख रूपये दान स्वरूपात मदत केली. हे 62 लाख पैशाच्या स्वरुपात नसून, रुग्णालयातील ट्रॉमा वॉर्डमध्ये आवश्यक असलेल्या मशिनच्या स्वरूपात देण्यात आलेत. पोर्टेबल व्हेंटिलेटर, इसीजी मशीन, इंनफ्युशन पम्प्स, लाईफ सपोर्टींग मशीन, आणि ट्रॉली अशा या वस्तू येथे दान केल्या गेल्या. शनिवारी 9 डिसेंबर 2016 रोजी जे.के.शाह यांच्या लग्नाचा वाढदिवस सायन रुग्णालयात साजरा करण्यात आला. यावेळी सायन रुग्णालयातील कर्मचारी तसेच डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. गेली 20 वर्षे शाह यांनी आपल्या 'बिधडा' संस्थेमार्फत रुग्णालयासाठी अनेकदा मदत केलीय. तसेच त्यांची ही संस्था गेल्या 40 वर्षांपासून समाजकार्य करतेय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या