Advertisement

तोंड आलंय? मग हे उपाय करा...


तोंड आलंय? मग हे उपाय करा...
SHARES

जशी वातावरणात हीट वाढते, तशीच शरीरातही हिट वाढते. आणि शरीरात निर्माण होणाऱ्या याच उष्णतेमुळे तोंडामध्ये फोड येतात. या फोडांनाच आपण 'तोंड येणं' असंही म्हणतो. यात तोंडाच्या आतील भाग लालसर होतो. त्यामुळे खाण्या-पिण्यामध्येही बऱ्याचदा त्रास होतो. याला 'माऊथ अल्सर'ही म्हणतात. बऱ्याचदा कॅल्शिअम आणि 'व्हिटॅमिन बी' ची कमतरता असल्यामुळे ही तोंड येण्याची समस्या उद्भवू शकते.


ही आहेत तोंड येण्याची कारणं

  • शरीरात व्हिटॅमिन बी ची कमतरता असणे
  • तोंडात एखादी जखम होणे
  • महिलांना मासिक पाळीच्या अगोदर हार्मोन्समध्ये बदल होणे
  • मानसिक तणाव
  • अपुरी झोप
  • तोंडातील जंतूंमुळे अॅलर्जी होणे



हे उपाय करा

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरम पाण्याच्या गुळण्या करा
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या
  • तोंड आलेल्या जागी थोडावेळ बर्फ लावा
  • व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 च्या सप्लिमेंट्स घ्या



तोंड येऊ नये म्हणून काय कराल ?

  • आंबट चवीची फळं जास्त प्रमाणात सेवन करू नका
  • मसालेदार पदार्थ खाऊ नका
  • तोंडाची स्वच्छता राखा
  • पुरेसा आराम आणि झोप घ्या
  • पोट साफ ठेवा
  • थंड खाण्याचा त्रास होत असेल, तर थंड खाणं टाळा



हेही वाचा

फार वेळ उभं राहू नका! नाहीतर व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होईल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा