Advertisement

कोरोनाचा संसर्ग जगात दिर्घकाळ टिकून राहणार, WHO चा इशारा

टेड्रोस यांनी जगातील आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणावर चिंता व्यक्त केली.

कोरोनाचा संसर्ग जगात दिर्घकाळ टिकून राहणार, WHO चा इशारा
SHARES

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस ॲडनोम गॅबियिसस यांनी कोरोनाचा संसर्ग जगात दिर्घकाळ टिकून राहण्याचा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी जगातील आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणावर चिंता व्यक्त केली.

टेड्रोस यांच्या मते, कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सामाजिक अंतर राखले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल लीड मारिया व्हॅन कर्खोवे यांनी सांगितलं की, कोरोनाचे संसर्ग हे पहिल्यासारखे नसून त्यामुळे कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे.

टेड्रोस यांनी सांगितलं की, कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण सर्वात मजबूत उपाय आहे. परंतु, यासोबतच मास्क, सामाजिक अंतर, स्वच्छता, चाचणी, आयसोलेशन हे पण तेवढंच गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

जगात आतापर्यंत १३.७२ कोटी लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात आले आहेत. यामध्ये २९.५९ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यातील ११.०४ कोटी लोक बरे झाले आहे. जगात आजघडीला २.३८ कोटी लोकांवर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा

रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत ठरली, आता 'या' किंमतीत खरेदी करा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा