21 जूनलाच योग दिन का साजरा करतात?

 Mumbai
21 जूनलाच योग दिन का साजरा करतात?
Mumbai  -  

27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाचं महत्त्व सांगणारं अभिभाषण केलं. त्याचवेळी त्यांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव ठेवला. यावेळी योगदिनाचं महत्त्वही त्यांनी विषद केलं.


21 जून का?

21 जून हा दिवस उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, तर दक्षिण गोलार्धात हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातल्या अनेक भागांमध्ये या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. याच दिवशी सूर्याचं दक्षिणायण सुरु होतं. अर्थात सूर्य दक्षिणेकडे कलू लागतो. सूर्याचं दक्षिणायण सुरु झाल्यानंतरची पहिली पौर्णिमा म्हणजेच पूर्ण चंद्र दिसणारा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगाविषयीचं ज्ञान जगासमोर आणलं. शिवाय सूर्याच्या दक्षिणायण कालात आध्यात्मिक पद्धतीने ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी नैसर्गिक परिस्थितीही अनुकूल असल्याचं मानलं जातं.

21 जून...जागतिक योग दिवस...2015 सालापासून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. योगसाधनेचं मूळ उगमस्थान हे भारतात असल्यामुळे संपूर्ण भारतात योग दिनाच्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अर्थात, याला मुंबईही अपवाद नाही. मुंबईत बुधवारी सकाळपासूनच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून नौदलातील अधिकाऱ्यांपर्यंत आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांपासून ते सामान्य शाळकरी मुलांपर्यंत सर्वांनीच योगाभ्यास केला. 'मुंबई लाइव्ह'नं योगप्रेमी मुंबईकरांच्या टिपलेल्या छायाचित्रांचं हे खास कलेक्शन!


Loading Comments