Advertisement

coronavirus : विप्रो ग्रुपकडून ११२५ कोटींची मदत

उद्योगजगतातील अनेकांनी देखील मदत केल्याचं पण समोर आलं आहे. त्यामुळे पीएम केअर्समध्ये (PN Cares) हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत. यात आणखी एक भर पडली असून विप्रो समुहानं सरकारला मोठी आर्थिक मदत केली आहे.

coronavirus : विप्रो ग्रुपकडून ११२५ कोटींची मदत
SHARES

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क येऊ नये म्हणून २१ दिवसांचा लॉक डाऊन देखील लागू केलं. पण तरीही जपाट्यानं रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारला आर्थिक सहायता करम्याची गरज आहे. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी सरकारला आर्थिक मदत केली आहे.

उद्योगजगतातील अनेकांनी देखील मदत केल्याचं पण समोर आलं आहे. त्यामुळे पीएम केअर्समध्ये (Pm Cares) हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत. यात आणखी एक भर पडली असून विप्रो समुहानं सरकारला मोठी आर्थिक मदत केली आहे. अझीम प्रेमजी (Azim Premji) यांच्या विप्रो समूहानं (Wipro Group) ११२५ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे जाहीर केलं आहे. मात्र समूह ही रक्कम पीएम केअर्स फंडमध्ये दान न करता अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्याद्वारे ही मदत करणार आहे.

विप्रो समूहानं बुधवारी एक स्टेटमेंट जारी केलं त्यानुसार, कोविड – 19 (Covid - 19) मुळे उद्भवलेल्या संकटात विप्रो लिमिटेड, विप्रो एंटरप्रायजेज आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन मिळून ११२५ कोटी रुपये खर्च करणार आहोत. ही रक्कम कोरोना प्रभावित भागात नागरिकांच्या मदतीसाठी, स्वास्थ सुविधा वाढवण्यासाठी वापरण्यात येईल. यासाठी अजीम प्रेमजी फाऊंडेशनच्या १ हजार ६०० कर्मचाऱ्यांची टीम काम करणार आहे.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ही ११२५ कोटी रुपयांपैकी १०० कोटी विप्रो लिमिटेड, २५ कोटी विप्रो एंटरप्रायजेज आणि १००० कोटी अझीम प्रेमजी फाऊंडेशनद्वारा देण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींनी पीएम केअर्स फंडमध्ये दान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार टाटा समूहनं १५०० कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली आहे. शिवाय रिलाइन्स इंडस्ट्रिजनं ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे. याशिवाय अदानी ग्रुप, वेदांता समूह, पेटीएम, जिंदल समूह आदींनी शेकडो कोटी रुपयांचे दान करणार असल्याचं जाहीर केलं आहे.



हेही वाचा

Coronavirus Update: राज्यातील ५ हजार जण हायरिस्क काॅन्टॅक्टमध्ये, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची धक्कादायक माहिती


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा