मुंबई लाइव्हकडून थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी पुढाकार

 Mumbai

See all

नरीमन पॉईंट - 'द विशिंग फॅक्टरी'च्या वतीने 24 ते 26 मार्चला थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. एनसीपीएच्या पिरामल हॉलमध्ये हे प्रदर्शन ठेवण्यात आलं. 'स्माईल डिस्पाईट एव्हरिथिंग' या थीमच्या आधारावर हे प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं. 'द विशिंग फॅक्टरी'च्या वतीने आयोजित केलेलं हे भारताचं पहिलं फोटो स्टोरी प्रदर्शन होतं. या प्रदर्शनात थॅलेसेमिया या आजाराशी लढत असणाऱ्या रुग्णांची स्टोरी दाखवली गेली. मुंबई लाइव्ह या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर होता.

थॅलेसेमिया हा एक असा अनुवांशिक रक्ताचा आजार आहे, ज्यात शरीरामधील हिमोग्लोबिनच्या प्रमाणात फरक पडतो. रुग्णाच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे त्याच्या शरीरात बाहेरुन रक्त चढवावं लागतं. या आजाराचं तीन महिन्यानंतर निदान होतं. याचा खर्चही मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने या आजाराची ट्रिटमेंट घेणं कठीण होतं. 12 ते 15 वर्षांच्या मुलांचा मृत्यूही या आजारामुळे होतो. भारताचा एकूण 3.4 टक्के भाग थॅलेसेमिया ग्रस्त आहे. अजूनही या आजाराचा उपचार होत नाही.

Loading Comments