Advertisement

plasma therapy: वोक्हार्ट हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार

पालिका रुग्णालयानंतर आता मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीचा वापर केला जाणार आहे.

plasma therapy: वोक्हार्ट हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार
SHARES

पालिका रुग्णालयानंतर आता मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीचा वापर केला जाणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा योग्य प्रतिसाद मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना आजारावर प्लाझ्मा थेरपी चाचणी घेण्यास वोक्हार्ट रुग्णालयाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मान्यता मिळाली आहे. 

वोक्हार्ट रुग्णालयात आतापर्यंत ५०० कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी पालिका आरोग्य विभागाकडून विविध उपचार पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याचाच एक भाग प्लाझ्मा थेरपी आहे. नायर रुग्णालयात रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी होऊन रुग्ण बरेही झाले आहेत. नायरमध्ये ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर महापालिकेच्या सायन रुग्णालयातही प्लाझ्मा थेरपीच्या चाचणीला सुरुवात झाली.  


कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात येते. २८ दिवसांनतर कोरोनाबाधित रुग्णाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्याच्यावर प्लाझ्मा थेरपीची चाचणी केली जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चच्या गाईडलाइनुसार ही चाचणी करण्यात येते. 


 कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा काढून तो कोरोनावर उपचार घेणाऱ्या  रुग्णास टोचला जातो. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून रुग्ण बरा होतो. मुंबई सेंट्रलच्या वॉकहार्ट हॉस्पिटलने रक्तदात्यांकडून प्लाझ्मा गोळा केला असून लवकरच या चाचण्या सुरू होणार आहेत. प्लाझ्मा थेरपीमध्ये एका निरोगी व्यक्तीकडून आजारी व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती स्थलांतरीत करून रुग्णाचा आजार बरा करण्यास मदत करते. या थेरपीमध्ये कोरोना व्हायसरवर मात केलेल्या रुग्णाकडून गंभीर स्वरूपात आजारी असलेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी अँटीबॉडीज तत्वाचा वापर केला जातो.



हेही वाचा -

G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी

३० मिनिटात कोरोनाचं निदान, पालिकेचं 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा