Advertisement

धावत्या ट्रेनमध्ये प्रसूतीकळा, वन रूपी क्लनिकमध्ये बाळाचा जन्म


धावत्या ट्रेनमध्ये प्रसूतीकळा, वन रूपी क्लनिकमध्ये बाळाचा जन्म
SHARES

ठाणे रेल्वे स्थानकात एका महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. २२ वर्षीय परवीन या महिलेने शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजता ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर ४ वर एका मुलीला जन्म दिला आहे. तिच्यावर तात्काळ ठाणे स्थानकात असणाऱ्या वन रुपी क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले.


धावत्या ट्रेनमध्येच प्रसूतीकळा

ही महिला टिटवाळा ते घाटकोपर असा ट्रेनमधून प्रवास करत होती. पण, मध्येच अचानक तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. गाडी ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर तिला वन रुपी क्लिनिकमध्ये नेण्यात आलं. आता परवीन आणि मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

वन रुपी क्लिनिकमध्ये असलेल्या ऑन ड्युटी डॉक्टर्स आणि सिस्टरने तिच्यावर तत्काळ उपचार केले. वन रुपी क्लिनिकने आतापर्यंत ४ यशस्वी प्रसूती केल्या आहेत. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रत्येक रेल्वे स्थानकात वन रुपी क्लिनिकचं किती महत्त्व आहे हे समोर येत आहे.

डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लिनिक



हेही वाचा

राजकीय दबावामुळे वन रुपी क्लिनिक बंद होणार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा