महिलेनं गिळली 5.2 सेंटिमीटरची सुई!

 MAHIM
महिलेनं गिळली 5.2 सेंटिमीटरची सुई!
महिलेनं गिळली 5.2 सेंटिमीटरची सुई!
महिलेनं गिळली 5.2 सेंटिमीटरची सुई!
महिलेनं गिळली 5.2 सेंटिमीटरची सुई!
महिलेनं गिळली 5.2 सेंटिमीटरची सुई!
See all
MAHIM, Mumbai  -  

तुम्हाला शिवणकाम करायची हौस असेल आणि त्यात जर तुम्हाला सुई तोंडात पकडायची सवय असेल तर ती सवय तुम्हाला खूप महाग पडू शकते. माहीममधल्या एका 28 वर्षीय महिलेने याच सवयीमुळे चक्क एक 5.2 सेमीची सुई गिळली. पण नशीब बलवत्तर म्हणून या महिलेचा जीव वाचला.

मुंबईच्या एस. एल. रहेजा रुग्णालयात डॉक्टरांच्या 2 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर माहीम परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा जीव वाचला. या महिलेवर अद्ययावत एन्डोस्कोपी करण्यात आली. त्या चाचणीत तिच्या आतड्यात अडकलेली 5. 2 सेमीची सुई दिसून आली. ही यानंतर तिला 6 तासांनंतर रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जिथे 3 ते 4 तपासण्यांनंतर सुईच्या निश्चित जागेचं निदान करण्यात आलं. त्यानंतर 'सिंगल बलून एन्ट्रोस्कोप' नावाच्या अद्ययावत अशा विशिष्ट उपकरणाच्या मदतीने 2 तासांत कुठल्याही शस्त्रक्रियेविना सुई काढण्यात डॉक्टरांना यश आलं.

5.2 सेमीची सुई नैसर्गिकरित्या महिला शरीराबाहेर काढू शकली नाही. कारण, सुई पोटात न जाता छोट्या आतड्यांमध्ये अडकली होती. ‘पचनसंस्थेच्या एन्डोस्कोपीच्या वेळी असं लक्षात आलं की ( upper gastrointestinal) सुई ही पोटात किंवा छोट्या आतड्यांमध्ये नसून, ती छोट्या आतड्यांच्या अतिशय आतील भागात म्हणजेच जेजुनममध्ये आहे. म्हणून 'सिंगल बलून एन्ट्रोस्कोप' नावाच्या अद्ययावत उपकरणाने तोंडाच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही शस्त्रक्रियेविना जेजुनमपर्यंत पोहचून सुरक्षितरित्या ती सुई काढली. तसंच महिलेला एका दिवसाच्या देखरेखीनंतर आम्ही डिस्चार्ज दिला असून सध्या ती व्यवस्थित आहे. तसंच तिला जेवणाचं कोणतंही पथ्य नसल्याचं रहेजा हॉस्पिटलचे गेस्ट्रोलॉजिस्ट डॉ. मेहुल चोकसी यांनी सांगितले.

सिंगल बलून एन्ट्रोस्कोप म्हणजे काय?

एन्डोस्कोपी करण्याचे अनेक प्रकार आहेत. पोटाच्या एका ठिकाणी छोटे छिद्र केले जाते आणि शरीराच्या ज्या भागात ती विशिष्ट वस्तू अडकली असेल तिते एन्डस्कोपी करण्यात येते. यामध्ये तोंडाशी छोटासा फुगा असलेली नळी तोंडावाटे पोटात सोडली जाते. आणि अडकलेली वस्तू त्या फुग्यामध्ये अडकल्यावर ती बाहेर काढली जाते. यामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची गरज भासत नाही.

Loading Comments