Advertisement

जागतिक स्किझोफ्रेनिया दिन - स्किझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय?

24 मे 1986 पासून प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यात स्किझोफ्रेनिया या आजाराविषयी जनजागृती केली जाते. 24 मे जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त घेतलेला हा आढावा.

जागतिक स्किझोफ्रेनिया दिन - स्किझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय?
SHARES

आधुनिक जीवनशैलीमुळे आज प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाखाली आहे. या ताणामुळेच आपली चिडचिड वाढते. याचं परिणाम पुढे असं होतं की लोकांसमोर आपल्या चिडचिड्या स्वभावाची "इमेज" तयार होते. काही लोक कधी कधी असं काहीही नसताना या त्रासाला सामोरे जाताना दिसतात. जसं कोणत्याही गोष्टीला घाबरणं किंवा कशाचंही भास होणं, नको त्या कारणाने चिडचिड होणं! आणि याच मानसिक आजाराला वैज्ञानिक भाषेत स्किझोफ्रेनिया म्हटलं जातं.

24 मे 1986 पासून प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यात स्किझोफ्रेनिया या आजाराविषयी जनजागृती केली जाते. 24 मे जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त घेतलेला हा आढावा....


स्किझोफ्रेनिया आजाराची लक्षणं

स्किझोफ्रेनिया एक मानसिक आजार आहे, हा रोग व्यक्तीच्या विचार आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचते, आणि याच कारणामुळे रुग्णाच्या नातेसंबंधात खंड पडताना दिसत आहे. स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्ती अगदी साधारण जबाबदाऱ्या हाताळण्यास असमर्थ ठरते. स्किझोफ्रेनिया पीडित बहुतांश रुग्ण २० ते २४ वर्षांचे असतात.


भावनिक समस्या :

भावनिकदृष्ट्या पीडित असलेल्या लोकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटलेला असतो. आपल्या आजूबाजूचा परिसर, लोक आणि वातावरणाशी त्यांचा काहीही संबंध नसतो, अशी व्यक्ती आपल्याच जगात हरवलेली असते. यामुळेच अशा व्यक्ती एकटेपणाचा शिकार बनतात. परिणामी त्यांच्या सभोवतालच्या गोष्टी त्यांना उदासीन वाटतात. अशा रुग्णांना कोणत्याही इतर व्यक्तींशी बोलणं किंवा मैत्री करणे आवडत नाही.


भ्रम :

भ्रम म्हणजे ज्या गोष्टी त्या ठिकाणी नाहीत तरी त्या व्यक्तीला त्या ठराविक गोष्टीचं भास होणं. स्किझोफ्रेनियाने पीडित व्यक्तीला कोणत्याही गोष्टींचा, सुगंधाचा आणि आवाजाचा भास होतो. परिणामी अशा व्यक्तींना भीती वाटू लागते. पण इतर लोकांना स्किझोफ्रेनिया पीडित लोकांचं असं वागणं पटत नाही. परिणामी इतर लोक त्या व्यक्तीबद्दल वेगवेगळे तर्क लावताना दिसतात.


अस्वस्थ विचार प्रक्रिया:

या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे विचार आणि समजून घेण्याची क्षमता खूप कमी असते. म्हणजे जर ते एखाद्या पदार्थाबद्दल बोलत असताना ते रंगाबद्दल चर्चा करतील. असे लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतात. कधी कधी ते एकट्यामध्ये विनाकारण बडबडत असतात.


वर्तणुकीची लक्षणं:

स्किझोफ्रेनियाने पीडित असलेले रुग्ण एकट्यामध्येच राहणे पसंत करतात. परिणामी त्यांना भीती, चिडचिडेपणा या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागतं. हे रुग्ण एकेकट्यामध्ये हसतदेखील बसतात.


या दिनाचं हेच खास वैशिष्ठ्य

मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीला समाजात एक वेगळी वागणूक दिली जाते. अशा व्यक्तींबद्दल कोणतेही निकष काढले जातात जसं की, अशा रुग्णांना कायम मेंटल ट्रीटमेंट घ्यवी लागेल पासून मानसिकदृष्ट्या लोकांचं कधी लग्नच होऊ शकणार नाही इथपर्यंत! पण मानसिकदृष्ट्या आजारी असणं हे त्या व्यक्तीचा दोष नाही, परंतु समाज आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्या रुग्णाला मनोबल देण्याचा प्रयत्न केल्यास तो त्या आजारापासून मुक्त होण्यासाठी प्रबळ बनेल आणि जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाचं हेच खास वैशिष्ठ्य आहे.


हेही वाचा - 

'या' ११ टिप्स तुम्हाला नैराश्यापासून परावृत्त करतील...

मनातलं बोलायला शिका नाहीतर...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा