Advertisement

गतिमान जीवनशैलीमुळे येते नैराश्य?


गतिमान जीवनशैलीमुळे येते नैराश्य?
SHARES

मुंबई - 7 एप्रिल म्हणजेच जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मुंबई लाइव्हने माणसाच्या आधूनिक जीवनशैलीमुळे होणारे आजार जास्त आहेत की, वाढतं प्रदूषण, अस्वच्छता, जंतूसंसर्ग यामुळे होणारे आजार जास्त आहे यावर एक खास रिपोर्ट तयार केला आहे.

मुंबई सारख्या महानगरात अनेक कारणांवरुन लोकं आजारी पडतात. त्याचं मुख्य कारण शारीरिक आजार हे तर आहेच. पण त्यातही कारणाशिवाय चिडचिड, उदासीनता येणं आणि त्यातून शारिरीक आजार होण्याचं प्रमाण जास्त वाढलंय. कामावर जाण्याची धावपळ, कामाचा तणाव, कॉर्पोरेट क्षेत्रातील स्पर्धा, घर आणि ऑफिसमधील तारेवरची कसरत अशा अनेक गोष्टींचा सामना आपण दररोज करतो. त्यातूनच काही आजार आपल्याला कळत नकळत जडतात. हे आजार दोन प्रकारचे असतात. एक जो मानसिक तणावामुळे होतो आणि दुसरा शारीरिक. त्यापैकी मानसिक आजार हे शारीरिक आजारांपेक्षा जास्त घातक आहेत. जे तुम्हाला आत्महत्या करण्यासही प्रवृत्त करु शकतात. मधुमेह आणि ब्लडप्रेशर या आजारांचंं प्रमाण तरुणांमध्येही जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2005 साली जगभरातील 300 दशलक्ष लोक हे मानसिक तणाव आणि उदासीनता या आजाराचे रुग्ण असल्याचं समोर आलं होतं. त्यामध्ये आता 18 टक्क्यांनी वाढ झालीय.

“या वर्षी इंडियन मेडिकल असोसिएशनने या उदासीनतेविषयी सर्व्हे केलाय. उदासीनता आल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या औषधांबाबतीत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्याचा प्रयत्न या वेळी या सर्व्हेक्षणातून करण्यात आला असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष (यूथ विंग) सागर मुंदडा यांनी सांगितलं.

कारणाशिवाय उदास वाटणं, कुठल्याच कामात आपल्याला रस न वाटणं, एकलकोंडेपणा ही उदासीनता वाटण्याची लक्षणे आहेत. हळूहळू उदासीनता हाच तुमचा मूळ स्वभाव बनतो. ज्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. त्यातून ब्लडप्रेशर, लठ्ठपणा, ह्रद्यविकाराचा झटका असे आजार प्रामुख्याने जडतात.-

- सागर मुंदडा, अध्यक्ष (यूथ विंग), इंडियन मेडिकल असोसिएशन

डेंग्यू, मलेरिया हे हवामानामुळे आणि जंतूसंसर्गामुळे होणारे आजार आहेत. त्याचं प्रमाण थोडफार कमी झालंय. पण, शरीराला मानसिक तणावामुळे होणारे आजार हे नेहमीच घातक आहेत.
- डॉ. सतिश त्रिपाठी , बी.एच.एम.एल


50 टक्के आजार हे मानसिक तणावामुळे होतात आणि 50 टक्के शारिरीक तणावामुळे होतात. ज्या आजारांचं प्रमाण 60 वर्षांपूर्वी कमी झालं होतं. ते आता परतले आहेत. प्रत्येकजण आपल्या गरजा भागवण्यासाठी धावतो, खूप प्रयत्न करत असतो आणि शेवटी जास्त तणाव घेऊन त्याला अनेक आजारांना समोर जावं लागतं. आपण छोट्या छोट्या कारणांसाठी धावपळ करत असतो. एखादी गोष्ट हवी म्हणून अनेक प्रयत्न करत असतो आणि ती गोष्ट मिळाली नाही तर उदासीनता येते. मग त्याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या आपल्या शरीरावर होतो.

- डॉ. मनोहर कामत, Consumer Activist

नुकत्याच मुंबईत घडलेल्या आत्महत्येच्या घटना

अभिनेता जिंतेद्र यांचा चुलतभाऊ नितीन द्वारकादास कपूर यांनी देखील आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं.
https://www.mumbailive.com/mr/around-you/actor-jeetendra-kapoors-cousin-brother-kills-himself-9061

वांद्र्याच्या ताज लँड्स अॅन्ड हॉटेलमधून एका तरुणाने 19 मजल्यावर उडी मारली.
https://www.mumbailive.com/mr/around-you/24-year-old-jumps-to-death-from-19th-floor-of-bandra-5-star-hotel-9911

ट्रेनखाली उडी मारून एकाची आत्महत्या
https://www.mumbailive.com/mr/around-you/man-jumps-on-the-track-at-tilak-nagar-station-9953

नैराश्येची लक्षणे -

  1. झोपेची काळ – वेळ बदलते
  2. अनिद्रेतेचा आजार होतो
  3. झोपेतून उठल्यानंतर फ्रेश न वाटणे
  4. कोणत्याही क्षणी आनंद वाटत नाही
  5. आवडत्या गोष्टीही करणं सोडून देणे
  6. लगेच थकवा जाणवतो
  7. हताश झाल्यासारखं वाटतं

अशी करा नैराश्यावर मात –

1 नैराश्य वाटल्यास सर्वात प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2 आपल्या क्षमतेनुसार काम करा.
3 आपल्या ताकदीबाहेरचे काम करू नका.
4 सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या.
5 आपल्या गरजा कमी करा.
6 नेहमी सकारात्मक विचार करा.
7. मित्र, नातेवाईक यांच्याशी चर्चा करा.
8. शांतपणे बसून दीर्घ श्वसन करा.
9. नियमित व्यायाम, योगा, फिरणे, पोहणे, नृत्य यामुळे शरीर सैलावते.
10. नियमित ध्यान व प्रार्थना करा.

याविषयी अनेकदा डॉक्टरांकडूनही जनजागृतीही केली जाते. पण, अजूनही नैराश्याची समस्या आटोक्यात आलेली नाही. शहरात राहणाऱ्या लोकांना मानसिक आणि शारिरीक अशा दोन्ही आजारांना सामोरं जावं लागतं. ग्रामिण भागात हे प्रमाण कमी आहे कारण गावात राहणाऱ्या लोकांच्या गरजा आणि अपेक्षा कमी असतात. तसंच ते निसर्गाच्या सानिध्यात जगतात. घड्याळ्याच्या काट्याशी बरोबरी करता करता बरेचदा आपल्या आरोग्याचं गणित चुकतं. हे चुकलेलं गणित जर सुधारायचं असेल तर, तणावमुक्त आणि नैसर्गिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि निरोगी रहा.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement