SHARE

मुलुंड - कुटुंबातील महिलेचे स्वास्थ्य उत्तम असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य ती महिला उत्तम राखू शकते. आणि म्हणूनच मुलुंडमध्ये दत्तात्रय अॅलेक्स येथे बुधवारी महिलांसाठी मोफत योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 'मिताई' या संस्थेने आयोजित केलेल्या या योगा शिबिरामध्ये महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. योगा कसा करावा? योगा करण्याचे फायदे काय? याचे प्रशिक्षण महिलांना यावेळी देण्यात आले. याचबरोबर महिलांनी वयोमानानुसार आहारात कोणती पथ्य पाळावीत याचीही माहिती महिलांना देण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या