Advertisement

Zydus Cadilaच्या ३ लसची किंमत १९००, किंमत कमी करण्यासाठी चर्चा सुरू

ही लस १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाईल.

Zydus Cadilaच्या ३ लसची किंमत १९००, किंमत कमी करण्यासाठी चर्चा सुरू
SHARES

झायडस कॅडेला (Zydus Cadila) नं त्याच्या तीन-डोस अँटी-कोरोनाव्हायरस लस Zycov-D ची किंमत १ हजार ९०० रुपये प्रस्तावित केली आहे. किंमत कमी करण्यासाठी सरकार आणि कंपनी यांच्यात चर्चा सुरू आहे आणि या आठवड्यात अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

ही लस १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाईल. सरकारनं सांगितलं की, जगातील पहिली डीएनए आधारित कोरोना विरोधी लस लवकरच लसीकरण मोहिमेत समाविष्ट केली जाईल. ही तीन डोसची लस देण्यासाठी सुईची गरज नाही. त्याचा आपत्कालीन वापर औषध नियामकानं मंजूर केला आहे. Zycov-D च्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितलं की, कंपनीनं तीन-डोस लसीसाठी सर्व करांसह १ हजार ९०० रुपये किंमत प्रस्तावित केली आहे. किंमत कमी करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. कंपनीला लसीच्या किंमतीबाबत सर्व पैलूंचा पुनर्विचार करण्यास सांगितलं गेलं आहे. यासंदर्भात सरकार आणि कंपनीमध्ये तीन फेऱ्यांची चर्चा झाली आहे.

इतर स्त्रोतांनी सांगितलं की, कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनच्या तुलनेत झीकोव्ह-डीची किंमत अधिक आहे. कारण त्यासाठी सुई नसलेले जेट इंजेक्टर लागेल जे बनवण्याचा खर्च सुमारे ३० हजार रुपये खर्च येईल. या जेट इंजेक्टरसह सुमारे २० हजार डोस लागू केले जाऊ शकतात.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर रविवारी म्हणाले की, केंद्राला सध्या झायडस कॅडिलाच्या अंतिम फेरीतल्या सकारात्मक परिणामांची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, भारत बायोटेकनं विकसित केलेल्या अनुनासिक लसीची दुसरी चाचणी पूर्ण झाली आहे. तर तिसरी चाचणी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे. भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला देखील बैठकी दरम्यान उपस्थित होते.

राष्ट्रीय लसीकरण (NTAGI) समितीतील तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी म्हटलं आहे की, जेव्हा मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू होईल, तेव्हा आधीच गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांना लसीकरण करण्यास प्राधान्य दिलं जाईल. ज्या मुलांची प्रतिकारशक्ती ठीक आहे त्यांना नंतर लसीकरण केलं जाईल. ते म्हणाले की उच्च धोका असलेल्या मुलांची माहिती घेतली जात आहे.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' ३ वॉर्डमध्ये १०० पेक्षा कमी सक्रिय रुग्ण

भारतातील २५ टक्के लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा