Advertisement

लवकरच Zydus Cadilaला मिळणार मंजुरी, १२-१८ वयोगटाला मिळणार डोस

भारतात लवकरच झायडस कॅडिला लसीला मंजुरी मिळणार आहे.

लवकरच Zydus Cadilaला मिळणार मंजुरी, १२-१८ वयोगटाला मिळणार डोस
SHARES

भारतात लवकरच झायडस कॅडिला (Zydus Cadila Vacccine) लसीला मंजुरी (Approval) मिळणार आहे. लहान मुलांसाठी उपलब्ध होणारी ही पहिली लस ठरू शकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Zydus Cadila लसीच्या आपत्कालीन वापराला याच आठवड्यात परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

Zydus Cadila ही लस १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठीदेखील प्रभावी असून पुढील दोन ते तीन आठवड्यांत ती या वयोगटासाठी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.

भारतात लहान मुलांसाठी उपलब्ध होणारी पहिली लस Zydus Cadila ठरू शकणार आहे. तर १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी उपलब्ध होणारी ती भारतातील सहावी लस असेल.

आतापर्यंत भारतात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक – व्ही या लसींना मान्यता मिळालेली आहे. तर मॉर्डना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांच्या लसींनाही मंजुरी मिळाली आहे.

भारत सरकारनं डिसेंबर २०२१ पर्यंत सर्व भारतीयांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. सध्या मात्र अनेक ठिकाणी लसी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावत असल्याचं चित्र आहे. अनेक भागात १८ ते ४५ वयोगटासाठीची लस सरकारी व्यवस्थेत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत.



हेही वाचा

बीएमसी कर्मचार्‍यांना वैद्यकीय गटविमा लागू

'या' रुग्णांसाठी मुंबईत ४ फिरती लसीकरण केंद्र

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा