Advertisement

म्हाडा लाॅटरी : ग्रँट रोडमधील कोट्यावधींच्या ३ घरांसाठी १३६ अर्ज

ग्रँट रोड येथील धवलगिरी सोसायटीत ८२.४६ चौ. मीटरचं एक घर असून त्याची किंमत ५ कोटी १३ लाख ४१ हजार ९४३ रुपये अशी आहे. याच सोसायटीत ८०.१४ चौ.मी. चं दुसरं घर असून या घराची किंमत ४ कोटी ९९ लाख ३५ हजार २३६ रुपये अशी आहे. तर तिसऱ्या घराची किंमत ५ कोटी ८० लाख ८ हजार २२२ रुपये इतकी अाहे.

म्हाडा लाॅटरी : ग्रँट रोडमधील कोट्यावधींच्या ३ घरांसाठी १३६ अर्ज
SHARES

गेल्या महिन्यात म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १३८४ घरांसाठी लाॅटरी लागली नि मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करू पाहणाऱ्यांची प्रतिक्षा संपली. मात्र, त्याचवेळी या लाॅटरीतील तीन घरांच्या किंमती एेकून अनेकांना भोवळ आली. ग्रँट रोड येथील धवलगिरी सोसायटीतील तीन घरांचा लाॅटरीत समावेश होता आणि या घरांच्या किमती ५ कोटी ते पावणेपाच कोटींच्या घरात होती. म्हाडाच्या घराची किंमत इतकी कशी असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला नि मग याच घराची चर्चा सगळीकडे सुरू झाली.


चांगला प्रतिसाद 

या घराला प्रतिसाद मिळेल का असाही सवाल या निमित्तानं उभा ठाकला. या प्रश्नाचं अखेर उत्तर आता मिळालं असून या घरांना इच्छुक अर्जदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कारण या तीन घरांसाठी १३६ अर्ज सादर झाले आहेत. तेव्हा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या तीन घरांसाठी १३६ अर्जदारापैकी कोण तीन जण बाजी मारतात हे १६ डिसेंबरला, लाॅटरीच्या दिवशीच समजेल.


किंमत धोरणात बदल

ग्रँट रोड येथील धवलगिरी सोसायटीत ८२.४६ चौ. मीटरचं एक घर असून त्याची किंमत ५ कोटी १३ लाख ४१ हजार ९४३ रुपये अशी आहे. याच सोसायटीत ८०.१४ चौ.मी. चं दुसरं घर असून या घराची किंमत ४ कोटी ९९ लाख ३५ हजार २३६ रुपये अशी आहे. तर तिसऱ्या घराची किंमत ५ कोटी ८० लाख ८ हजार २२२ रुपये इतकी असून या घराचं क्षेत्रफळ ९१.६३ चौ. मी. इतकं आहे. या घरांच्या किंमती ९ कोटींच्या घरात जाणार होत्या. मात्र म्हाडानं किंमतींच्या धोरणात बदल केल्यानं घरांच्या किंमती ५ ते ६ कोटींच्या घरात आणणं मुंबई मंडळाला शक्य झालं आहे. 


आश्चर्याची बाब

  म्हाडाच्या घरांच्या किंमती पाच कोटींच्या वर जाणं ही अनेकांना आश्चर्यचकीत करणारी बाब होती. त्यामुळं एकीकडे यावरून टीका होत होती तर दुसरीकडे या घरांच्या प्रतिसादावरूनही प्रश्न उपस्थित केला जात होता. पण अखेर या घरांना चांगला प्रतिसाद मिळाला असून तीन घरांसाठी १३६ अर्ज आले आहेत. 



हेही वाचा - 

म्हाडाच्या घरांसाठी १ लाख ६४ हजार अर्ज; एका घरामागे ११८ दावेदार

म्हाडाच्या अर्जासाठी अनामत रक्कम होणार कमी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा